स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा

    26-Apr-2026
Total Views |
 

clean 
 
शहरात विविध प्राधिकरणांकडून सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांची महापालिकेच्या आयु्नत अश्विनी भिडे यांनी पाहणी केली. कामांसाठी नेमलेल्या कंत्राटदारांकडून कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखली जात नसेल, तर तात्काळ कारवाई करा, असे निर्देश त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. बांधकाम साहित्य अनेक दिवस कामाच्या ठिकाणी पडून राहत असेल, माेकळ्या जागांवरून बांधकामाचा राडाराेडा हटवला नसेल अशा कंत्राटदारांना नाेटीस पाठवून कारवाई करा, अशा सूचना आयु्नतांनी दिल्या.
पश्चिम उपनगरांतील धर्मशाळा चाैकी, शासकीय तंत्रनिकेतनसमाेर सुरू असलेली वांद्रे-खेरवाडी परिसरातील रस्त्यांची स्वच्छता, पश्चिम द्रुतगती महामार्ग, चर्चराेड मराेळ सेक्शन रस्ता चाैकी, अंधेरी पूर्व येथील गुरू गाेविंदसिंगजी मार्गावरील वाहनतळ, जे. बी. राेड मेट्राे स्टेशन चाैकी,चर्चराेड मराेळ अंधेरी पूर्व येथील सावित्रीबाई फुले उद्यान अशा विविध ठिकाणी आयु्नतांनी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली.
 
मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ुशल मनुष्यबळ आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा याेग्य वापर करावा. एखाद्या ठिकाणचा कचरा उचलल्यानंतर ती जागा लगेच स्वच्छ करा. प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याने वैय्नितक पातळीवर प्रयत्न करावा. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करावी. लाेकप्रतिनिधींशी समन्वय ठेवावा. आठवड्यातून एकदा प्रत्येक रस्ता स्वच्छ धुतला जावा, अशा सूचना आयु्नतांनी अधिकाऱ्यांना दिल्या.शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागाने आपासात तसेच इतर प्राधिकरणांशी समन्वय वाढवावा. आधुनिक यंत्रसामग्री, कुशल मनुष्यबळाचा याेग्य वापर करून शहरातील प्रमुख रस्ते-महामार्ग, त्याभाेवतीचा परिसर, दुभाजक स्वच्छ ठेवावेत. माेकळ्या जागांवरील बांधकाम राडाराेडा तत्काळ हटवून मुंबईचे साैंदर्य वाढवण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.