या आठवड्यात तुमच्यासाठी शिस्त, धैर्य व जबाबदाऱ्या पार पाडण्याचा संकेत दिसून येत आहे. तुम्ही तुमच्या लक्ष्यांविषयी गंभीर राहाल व हळू हळू प्रगतीच्या दिशेने पुढे जात राहाल. यावेळी घाई करण्याऐवजी नियाेजनपूर्वक पुढे जाणे जास्त फायद्याचे ठरेल.
नाेकरी-व्यवसाय : क्षेत्रात या आठवड्यात मेहनत व निरंतरतेची गरज असणार आहे. कार्यस्थळावर तुमच्यावर जादा जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. व्यापार करणाऱ्या जातकांना हळू हळू लाभ मिळेल. विशेषत: त्यांनी जुन्या अनुभवांचा याेग्य वापर करावा.
नातीगाेती : या आठवड्यात नात्यांबाबत संतुलन राखायला हवे. तुम्ही तुमच्या कुटुंब व कामात संतुलन राखण्याचा प्रयत्न कराल. जीवनसाथीसाेबत काही गंभीर चर्चा हाेण्याची श्नयता आहे ज्या भविष्यकाळासाठी महत्त्वाच्या असू शकतात. प्रेमसंबंधात स्थिरता राहील.
आराेग्य : या आठवड्यात तुमची तब्बेत सामान्य राहील पण थकवा व शरीर आखडणे जाणवू शकते.हाडे गुडघेदुखी व त्वचेच्या समस्यांची श्नयता जास्त आहे. तुम्हाला नियमित व्यायाम व नियमित दिनचर्या अवलंबून तुमचे आराेग्य व्यवस्थित राखायला हवे.
शुभदिनांक : 29, 30, 02
शुभरंग : निळा, जांभळा, काळा
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात काेणत्याही कामात अत्याधिक कठाेरपणा व हट्ट टाळावा. इतरांच्या भावना समजून घ्याव्यात.
उपाय : या आठवड्यात शनिवारी शनिदेवाला तीळाचे तेल अर्पण करावे.गरिबांना काळे तीळ वा वस्त्र दान करावे.