हा आठवडा तुमच्यात भावनिक खोली व संवेदनशीता वाढवणारा राहील. तुम्हाला तुमच्या माणसांची साथ लाभेल व तुम्ही भावनिक परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकाल. व्यावसायिक वर्गासाठी हा आठवडा अनुकूल राहील व त्यांचा लाभ वाढता राहील.
■ नोकरी-व्यवसाय : या आठवड्यात करिअर व्यवसाय क्षेत्रात संतुलन राखायला हवे. कार्यस्थळावर काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. करिअरविषयी एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. व्यापारी वर्गाला या आठवड्यात मनाजोगा नफा कमावता येईल.
नातीगोती : नात्यांबाबत हा आठवडा खास राहणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुहे मनाला शांती लाभेल. जोडीदारासोबत भावनिक संबंध अधिक मजबूत होतील. जर एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मतभेद झाले असतील तर ते मिटवण्यासाठी योग्य काळ आहे.
■ आरोग्य या आठवड्यात आरोग्य सामान्य राहील पण मानसिक तणाव टाळणे जरुरीचे असणार आहे. झोप पूर्ण न झाल्यामुळे व जास्त विचार केल्यामुळे थकवा जाणवू शकतो. योग, ध्यान व शांत वातावरणात वेळ घालवणे तुमच्यासाठी योग्य ठरेल.
■ शुभदिनांक : २६,०१, ०१
शुभरंग पिवळा, लाल, पांढरा
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार
■ दक्षता या आठवड्यात भावुकपणाने कोणताही मोठा निर्णय घेऊ नये.
■ उपाय : सोमवारी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा. चंद्राला अर्घ्य द्यावा.