मेष

    26-Apr-2026
Total Views |
 

horoscope 
या आठवड्यात तुमच्यात एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा काम करील. जी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळे व काही नवे करण्यासाठी प्रेरित करील. परिस्थिती हळू हळू तुमच्या बाजूने हाेताना दिसेल. पण तुम्ही धैर्य व समजुतदारपणा राखायला हवा. जुनी कामे पूर्ण हाेतील व भविष्याची दिशा बदलणाऱ्या संधी मिळतील.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात करियर व व्यवसाय क्षेत्रात सावधपणे पुढे जाण्याचा काळ आहे. कार्यस्थळावर तुमच्या कामाची प्रशंसा हाेईल पण साेबत जबाबदाऱ्याही वाढतील. नव्या संधी आकर्षक वाटतील पण प्रत्येक संधी तुमच्यासाठी याेग्य असेलच असे नाही.
 
 नातीगाेती : हा आठवडा काैटुंबिक जीवनात भावनात्मक संतुलनाची परीक्षा घेऊ शकताे. तुम्ही जवळील लाेकांसाेबत वेळ घालवल्याने नाती मजबूत हाेतील. जर एखादा जुना मतभेद असेल तर ताे साेडवण्याची याेग्य वेळ आहे.प्रेमसंबंधात सचाेटी व विश्वास टिकवणे गरजेचे असेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील पण मानसिक थकवा व थाेडासा तणाव राहू शकताे. नियमित दिनचर्या राखावी व पुरेसा आराम घ्यावा. बाहेरचे खाणे-पिणे सध्या टाळायला हवे. माेसमी आजारांची शिकार हाेण्यापासून तुम्ही स्वत:ला जपायला हवे.
 
 शुभदिनांक : 26, 01, 01
 
 शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
 शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
 दक्षता : या आठवड्यात घाईगडबडीत काेणताही निर्णय घेऊ नये. आर्थिक बाबतीत सावध राहावे.
 
 उपाय : मंगळवारी लाल कापड वा लाल फूल दान करावे. राेज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावा व श्रीगणेशाचे ध्यान करावे..