तुमच्यासाठी हा आठवडा नव्या विचारांत आणि रचनात्मक बदलांमध्ये जाणारा असणार आहे. तुम्ही पारंपरिक मर्यादांपेक्षा वेगळे काही करण्याचा विचार करू शकता.तुमच्यात रचनात्मकतेची व स्वतंत्रतेची भावना राहील जी तुम्हाला नव्या दिशेने पुढे जाण्यास प्रेरित करील.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात आधुनिकता व नव्या प्रयाेगांचा संकेत मिळत आहे. कार्यस्थळावर तुमच्या आगळ्या वेगळ्या विचारांची वाहवा हाेऊ शकते. तुम्ही एखाद्या नव्या प्राेजे्नट वा तंत्राशी जुळून राहू शकता. व्यापाऱ्यांसाठी आठवडा फायदेशीर राहू शकताे, पण निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या नात्यांबाबत एक वेगळीच ऊर्जा घेऊन याल. तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्पेसला जास्त महत्त्व द्याल. ज्यामुळे जवळच्या लाेकांपासूनही दुरावा जाणवू शकताे. जीवनसाथी वा प्रेमीसाेबत स्वष्ट बाेलणे ठेवणे गरजेचे आहे. मित्रांसाेबतचा वेळ प्रसन्नता देईल.
आराेग्य : या आठवड्यात आराेग्याची काेणती ना काेणती समस्या राहण्याची श्नयता नाही. पण अनियमित दिनचर्या टाळायला हवी. झाेपेचा अभाव वा मानसिक थकवा जाणवू शकताे. याेग, ध्यान व नियमित व्यायाम तुम्हाला संतुलित राखून ठेवील. बाहेरचे खाणे टाळावे.
शुभदिनांक : 29, 30, 02
शुभरंग : निळा, जांभळा, काळा
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात अत्याधिक स्वातंत्र व बेपर्वाई साेडावी. महत्त्वाची कामे टाळणे नुकसान करू शकते.
उपाय : शनिवारी शनिदेवाची पूजा करावी व गरजूंना काळे कपडे वा उडीद डाळ दान करावी.