वृद्ध कलावंतांची आधार पडताळणी तात्काळ करावी : सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

    26-Apr-2026
Total Views |
 

aadhar 
 
राज्यातील वृद्ध कलावंतांना मानधन मिळण्यासाठी आवश्यक असलेली आधार पडताळणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून वृद्ध कलावंतांचे मानधन तत्काळ देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत झालेल्या आढावा बैठकीत विविध जिल्ह्यांतील आपले सरकार सेवा केंद्रे, आधार सेवा आणि वृद्ध कलावंत मानधन या संदर्भातील विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यमंत्री मेघना साकाेरे-बाेर्डीकर, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव महेश वाव्हळ, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे; तसेच महाआयटी संचालक भुवनेश्वरी एस. आणि जालना, लातूर, परभणी, बुलढाणा, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित हाेते. राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रांची तपासणी करून त्यांची पुनर्स्थापना करावी. मुंबई उपनगरांत आधार सेवांची वाढती मागणी लक्षात घेता महापालिका शाळा व महाविद्यालयांत आधार केंद्रे सुरू करण्याचा पर्याय विचाराधीन ठेवण्याचे निर्देश शेलार यांनी दिले.