जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब काेरे वारणा नवश्नती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तीन उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सुमारे 5200 काेटींचा सामंजस्य करार करण्यात आला.राज्याच्या ऊर्जा क्षमतेत वाढीसाठी हा करार महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, या माध्यमातून कमी खर्चात माेठ्या प्रमाणावर ऊर्जा साठवणूक करून राष्ट्रीय ग्रीड स्थिर ठेवण्याची क्षमता राज्यात निर्माण हाेईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा सचिव संजय बेलसरे, आमदार डाॅ. विनय काेरे, नवश्नती निर्माण संस्थेचे अध्यक्ष नामदेव पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लाेकेश चंद्रा, प्रधान सचिव डाॅ. श्रीकर परदेशी आदी उपस्थित हाेते.
तात्यासाहेब काेरे वारणा नवश्नती निर्माण संस्थेच्या वतीने कुंभी ऑफ स्ट्रीम क्लाेज्ड लूप उदंचन प्रकल्प (जि. काेल्हापूर) सिंधुदुर्ग व शाहूवाडी येथे कडवी ऑफ स्ट्रीम क्लाेज्ड लूपउदंचन प्रकल्प हा एक असे तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.या माध्यमातून सुमारे 5199 काेटींची गुंतवणूक हाेणार असून, 1100 मेगावाॅट वीजनिर्मिती क्षमता स्थापित हाेणार आहे. या तिन्ही प्रकल्पांतून 1100 राेजगारनिर्मिती हाेणार आहे.राज्याला ऊर्जा स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टीने उदंचन जलविद्युत (पंप्ड स्टाेरेज) प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरत असून, सह्याद्रीच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा परिणामकारक उपयाेग करण्याची ही माेठी संधी आहे. या प्रकल्पांमुळे केवळ वीजनिर्मितीच नव्हे, तर पावसाळ्यात समुद्रात जाणारे पाणी वळवून दुष्काळग्रस्त भागांना मदत करण्यासारखे अप्रत्यक्ष फायदेही साध्य हाेऊ शकतात. सहकार क्षेत्रात अशा प्रकल्पांची सुरुवात हाेत असून, सहकारातील हा पहिला प्रकल्प अधिक वेगाने पूर्ण हाेईल, असा विश्वास डाॅ. काेरे यांनी व्य्नत केला.