गाेसीखुर्द प्रकल्पातील जलपर्यटनाच्या पहिल्या टप्प्याचे काम त्वरित पूर्ण करा : शिंदे

    25-Apr-2026
Total Views |
 
 

shinde 
भंडारा जिल्ह्यातील गाेसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एकचे काम त्वरित पूर्ण करून टप्पा दाेनचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सह्याद्री अतिथीगृहात या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आमदार नरेंद्र भाेंडेकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गाेविंदराज, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यावेळी उपस्थित हाेते. जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी व गाेसीखुर्दचे मुख्य अभियंता ऑनलाइन सहभागी झाले हाेते. शिंदे यांनी गाेसीखुर्द जलपर्यटनाच्या कामांचा आढावा घेतला. नागपूर ते भंडारा राेडदरम्यान धावणाऱ्या ब्राॅडगेज मेट्राेबाबतही चर्चा करण्यात आली. ही मेट्राे सेवा भंडारा शहरापर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी भाेंडेकर यांनी केली. त्यानुसार शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महारेल व रेल्वे बाेर्डाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले.