मुंबईत एका बहुराष्ट्रीय कंपनीत नाेकरी करणाऱ्या रसिका कदम या 27 वर्षांच्या तरुणीने हातात दुसरी नाेकरी नसतानाही मागच्या आठवड्यात नाेकरीचा राजीनामा दिला. गेल्या दाेन वर्षांपासून या नाेकरीच्या कामात तिला फारसा उत्साह वाटत नव्हता आणि डेडलाईनच्या धावपळीने ती थकूनही गेली हाेती. रात्री नाेकरीच्या जाहिराती चाळणे आणि ज्या पर्यायांवर ती कधीच कृती करत नसे, त्यांचा विचार करणे हा तिचा नेहमीचा दिनक्रम झाला हाेता.आपण येथे आनंदी नाहीत आणि कधी हाेऊ शकत नाही, हे तिला कळत हाेते. पण तरीही नाेकरी साेडण्याचा निर्णय ती घेऊ शकत नव्हती.अखेर तिच्या जवळच्या मैत्रिणीने राजीनामा दिल्यानंतर एका आठवड्यात तिनेही राजीनामा दिला. मी ज्या कारणासाठी तेथे थांबले हाेते, ते कारणच अचानक अदृश्य झाले. त्यानंतर तेथे राहण्यात मला कसलाच रस राहिला नव्हता, असे ती नंतर म्हणाली.
रसिकाची गाेष्ट ही एका विशिष्ट मुलीची गाेष्ट वाटू शकेल. पण ती कामाच्या ठिकाणच्या एका व्यापक पद्धतीकडे निर्देश करते, विशेषतः जेन झीच्या. त्याला तुम्ही कामाच्या ठिकाणच्या घट्ट मैत्रीचा प्रभाव असेही म्हणू शकता. किंवा बाेलीभाषेत, ट्राॅमा बाँड. एका व्यक्तीकडून मिळणाऱ्या भावनिक आधारामुळे कर्मचारी आव्हानात्मक, अनेकदा असमाधानकारक नाेकऱ्यांमध्ये टिकून राहतात.प्रत्यक्षात, त्या आधाराचा अर्थ म्हणजे तणावपूर्ण दिवसांमध्ये एकमेकांना मनमाेकळेपणाने बाेलणे, लांबलेल्या बैठकांमध्ये एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहणे, चहाच्या ब्रेकवर गप्पा मारणे किंवा फाेनवर बाेलता बाेलता मनातले बाेलून माेकळे हाेण्यासाठी छाेटे संदेश पाठवणे.तणावपूर्ण कामाच्या ठिकाणी मैत्री ही याेगायाेगाने जुळत नाही, तर ती एक उपयुक्त बाब असते. अन्यथा एकाकी किंवा दडपण आणणाऱ्या वातावरणात मैत्री ही एक सामना करण्याची अनाैपचारिक प्रणाली म्हणून काम करते.
कामाच्या ठिकाणची मैत्री ही शाळा किंवा महाविद्यालयातील मैत्रीइतकीच महत्त्वाची असते. ही अशी सामायिक ठिकाणे असतात, जिथे लाेक एकमेकांसाेबत बराच माेठा काळ व्यतीत करतात. अनेकांसाठी, अगदी एकच विश्वासू सहकारीसुद्धा एक आधारभूत शक्ती म्हणून कार्य करू शकते.गतिमानतेमागील माहिती हा ऐकीव माहितीवर आधारित किस्सा वाटेल, पण त्याला संशाेधनाचा आधार आहे. एका संघटनात्मक वर्तन मंचाने 2024मध्ये केलेल्या संशाेधनानुसार कामाच्या ठिकाणी एक जिवलग मित्र असणे हे कर्मचारी प्रतिबद्धता आणि कामगिरीच्या सर्वात प्रभावी प्रेरकांपैकी एक आहे.कामाच्या ठिकाणी घनिष्ठ मैत्री असलेले कर्मचारी सहकारी आणि ग्राहकांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधतात, अधिक उत्पादनक्षम असतात आणि नवनिर्मितीमध्ये याेगदान देतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते नाेकरीत टिकून राहण्याची शक्यताही जास्त असतेकाेविडनंतर कामाच्या ठिकाणच्या मैत्रीचे महत्त्व वाढले आहे. कारण त्या काळात तणाव आणि अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांशी असलेल्या नात्यांवर माेठ्या प्रमाणावर अवलंबून राहिले हाेते. आणखी एका अहवालानुसार 85% कर्मचाऱ्यांचा असा विश्वास आहे, की कामाच्या ठिकाणी मित्र असल्यास कर्मचारी नाेकरीत टिकून राहण्याची अधिक शक्यता असते. 78% नाेकरी शाेधणारे याच्याशी सहमत आहेत. सुमारे 64% कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कामाच्या ठिकाणच्या मैत्रीमुळे ते अपेक्षेपेक्षा जास्त काळ नाेकरीत टिकून राहिले.तर जवळपास एक तृतीयांश लाेकांनी सांगितले, की जिथे असे नातेसंबंध निर्माण करता आले नाहीत, तिथे त्यांनी नाेकरी साेडली. हे निष्कर्ष दाेन सर्वेक्षणांवर आधारित आहेत.
एक सर्वेक्षण नाेकरभरतीचे निर्णय घेणाऱ्या 1001 जणांमध्ये, तर दुसरे 1039 नाेकरी शाेधणाऱ्यांमध्ये करण्यात आले. जनरेशन झेडसाठी या गतिशीलता अधिकच ठळक आहेत. ही पिढी अधिक भावनिक जाणिवेसह वाढली आहे. मात्र त्याच वेळी त्यांना नाेकरीची अस्थिरता आणि कामाचे दीर्घ तास या आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. ते सक्रियपणे भावनिक आधाराचा शाेध घेत असतात आणि अनेकदा त्यांना हा आधार कामाच्या ठिकाणीच मिळताे.धक्काप्रतिबंधक व्यवस्था जेव्हा नाहीशी हाेते दिवसेंदिवस त्याच त्या दबावांचा सामना करण्यातून अनेकदा प्रगाढ मैत्री निर्माण हाेते आणि अशा मैत्रीतील एखाद्या व्यक्तीने नाेकरी साेडली तर दुसरी व्यक्तीसुद्धा नाेकरी साेडण्याची शक्यता सर्वाधिक असते. हे अचानक घडले असे वाटू शकते. आपण तसे फार क्वचितच असते.
यापैकी बहुतेक संबंध ताेडण्याची प्रक्रिया बऱ्याच काळापासून सुरू असते. हे साचलेल्या मानसिक थकव्याचा परिणाम असताे. ती मैत्री त्यांना या परिस्थितीशी जुळवून घ्यायला मदत करत हाेती. एकदा का ती मैत्री संपली की, वास्तवाकडे दुर्लक्ष करणे अधिक कठीण हाेऊन बसते.अवलंबून राहण्याचा धाेका या संदर्भातल्या अनेक अहवालांमध्ये दिलेल्या अनेक पुराव्यांनंतरही अनेक संस्था कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठी विशेष सुविधांवर लक्ष केंद्रित करत आहेत. पण या सुविधा मूळ समस्येचे निराकरण करत नाहीत.लाेक सुविधांच्या अभावामुळे नाेकरी साेडत नाहीत. ते नाेकरी साेडतात कारण त्यांना पाठिंबा मिळत नाही, त्यांचे म्हणणे ऐकले जात नाही किंवा त्यांना सुरक्षित वाटत नाही.आता अनेक कंपन्यांना कामाच्या ठिकाणच्या मैत्रीचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे. तरी खूप कमी कंपन्या अशा मैत्रीला पाेषक परिस्थिती, आटाेपशीर कामाचा भार, सहानुभूतीपूर्ण नेतृत्व आणि मानसिक सुरक्षितता यांमध्ये गुंतवणूक करत आहेत.
त्याच वेळी, आधार आणि परावलंबन यांच्यामध्ये एक नाजूक सीमारेषा असते. जेव्हा एखादी व्यक्ती केवळ एकाच व्यक्तीमुळे नाेकरीत टिकून राहते, किंवा त्या व्यक्तीने साेडून जाण्याच्या विचारानेच मनात तीव्र अस्वस्थता निर्माण हाेते, तेव्हा ही बाब चिंतेचा विषय बनते. निराेगी मैत्री विकासाला हातभार लावते; तर कुबडी मात्र व्यक्तीला एकाच जागी खिळवून ठेवते.हा एक असा प्रश्न आहे ज्याला अधिकाधिक तरुण व्यावसायिक सामाेरे जाऊ लागले आहेत.कारण कामाच्या ठिकाणी असलेले घनिष्ठ संबंध आणि मानसिक आघातांवर आधारित बंध यांसारख्या भाषेमागे एक कठाेर सत्य दडलेले आहे. जर एखादी नाेकरी केवळ एकाच व्यक्तीमुळे सहन करण्यायाेग्य वाटत असेल, तर ती कदाचित दीर्घकाळ टिकण्यासारखी नसू शकते. या मैत्रीमुळे कितीही दिलासा मिळत असला, तरी काही वेळा यामुळे कठीण निर्णय घेण्यास विलंब हाेऊ शकताे. जेव्हा हा आधार नाहीसा हाेताे, तेव्हा केवळ कामाच्या ठिकाणचे वास्तवच उरते; आणि ही स्पष्टता काहीशी अस्वस्थ करणारी असली, तरी ती तितकीच आवश्यकही असते.