राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत 50 इनक्युबेशन सेंटर्स स्थापन करा

    25-Apr-2026
Total Views |
 
 

krushi 
 
राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत कृषी उत्पादन विक्रीला प्राेत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 50 ग्री-बेस्ड इनक्युबेशन सेंटर्स सुरू करा. कृषी ि व द्य ा प ी ठ ा ं त तयार हाेणाऱ्या कृषी उत्पादनांची विक्री व्हावी, शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळावे व कृषी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना कृषी उद्याेजक हाेण्यासाठी प्राेत्साहन मिळावे यासाठी हा उपक्रम राबवावा, असे निर्देश राज्यपाल तथा कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी दिले.राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली लाेकभवनात कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग आणिकृषी विद्यापीठांच्या उपक्रमांवर उच्चस्तरीय बैठक झाली. पशुसंवर्धन विभागावे सचिव एन. रामस्वामी, राज्यपालांचे सचिव डाॅ.प्रशांत नारनवरे, कृषी आयु्नत सूरज मांढरे, मत्स्यव्यवसाय आयु्नत प्रेरणा देशभ्रतार, पशुसंवर्धन विभागाचे आयु्नत डाॅ. किरण पाटील आणि राज्यातील प्रमुख कृषी विद्यापीठांचे कुलगुरू यावेळी उपस्थित हाेते.
 
मांढरे यांनी कृषी विभागाचे सादरीकरण केले. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.नितीन पाटील यांनी महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे सादरीकरण केले. डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ संजय भावे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डाॅ. विलास खर्चे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकाेला विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डाॅ.इंद्रमणी यांनी विद्यापीठांची व विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती राज्यपालांना सादर केली.