आराेग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी निधीचे याेग्य नियाेजन करण्याचे निर्देश आराेग्य राज्यमंत्री मेघना साकाेरे-बाेर्डीकर यांनी दिले. सन 2025-26 या आर्थिक वर्षातील राज्य निधी तसेच राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत प्राप्त निधी व त्याच्या नियाेजनाबाबत आराेग्य भवनात आढावा बैठक झाली. राज्य औषधी द्रव्ये व साहित्य खरेदी प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला; तसेच 2024 ते 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या औषधे व यंत्रसामग्री खरेदीचे परीक्षण करण्यात आले. चालू वर्षातील कामकाजाचे नियाेजन आणि रेट काॅन्ट्रॅक्ट प्रक्रियेची अंमलबजावणी याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. एक पाऊल थॅलेसेमियामु्नतीकडे या अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी कार्यक्रम प्रमुखनिहाय प्रस्तावित अंदाजपत्रक, कार्यक्रम खर्च आणि अनिवार्य खर्चाचा आढावा बाेर्डीकर यांनी घेतला. बैठकीस आराेग्य सेवा आयु्नत तथा राष्ट्रीय आराेग्य अभियानाच्या अभियान संचालक डाॅ.कादंबरी बलकवडे, आराेग्य सेवा संचालक डाॅ. विजय कंदेवाड यांच्यासह आराेग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.