गाेदा ते नर्मदा जलयात्रेस आजपासून प्रारंभ : जलसंपदा मंत्री विखे पाटील

    25-Apr-2026
Total Views |
 
 

goda 
जल व्यवस्थापन अधिक गतिमान, लाेकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जल व्यवस्थापन कृती पंधरवडा उपक्रमांतर्गत गाेदा ते नर्मदा पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर जलयात्रेस 25 एप्रिलला प्रारंभ हाेणार आहे. या जलयात्रेतून जलसंवर्धनाचा व्यापक संदेश सर्वदूर पाेहाेचवण्याचा संकल्प असल्याची माहिती जलसंपदा (गाेदावरी व कृष्णा खाेरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. विचार, वारसा आणि विकास या त्रिसूत्रीवर आधारित ही जलयात्रा आयाेजिण्यात आली आहे. जलसंवर्धनाबाबत जनजागृती, लाेकसहभाग आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट करणे हा या जलयात्रेचा मुख्य उद्देश आहे.
 
पुण्यश्लाेक अहिल्यादेवींचे जन्मस्थान श्री क्षेत्र चाेंडी आणि गाेदावरीचे उगमस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून एकाचवेळी जलयात्रेस प्रारंभ हाेणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ हाेणार असून, 108 कन्यांचे पूजन, गाेदामातेचे पूजन तसेच विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र चाेंडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत या यात्रेस प्रारंभ हाेणार आहे.चाेंडीतून निघणारी यात्रा अहिल्यानगरला मु्नकाम करेल, तर त्र्यंबकेश्वरहून निघणारी यात्रा नाशिक, सिन्नर आणि संगमनेरमार्गे 26 एप्रिलला शिर्डीत येथे एकत्र येईल.त्यानंतर एकत्रितपणे यात्रा पुढे मार्गस्थ हाेईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.