काॅर्पाेरेट कंपन्यांमध्ये व्यापक तपासणी माेहीम राबवणार : विजया रहाटकर

    25-Apr-2026
Total Views |
 
 

corporate 
 
नाशिकमधील आयटी कंपनीतील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरातील काॅर्पाेरेट कंपन्यांमध्ये अचानक तपासणी (इन्स्पेक्शन) माेहीम राबवण्याचा इशारा राष्ट्रीय महिला आयाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिला. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठाेर पावले उचलली जाणार असून, संबंधित प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीबीडी बेलापूर येथील सिडकाे भवनातील कार्यक्रमात रहाटकर सहभागी झाल्या हाेत्या. नाशिकमधील टीसीएस कंपनीत महिलांवर झालेले लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या आराेपांमुळे खळबळ उडाली आहे. अशा प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष स्थानिक पथके स्थापन केली जाणार आहेत. या पथकांमध्ये शासकीय महिला अधिकारी; तसेच स्वयंसेवी संस्थांमधील महिलांचा समावेश असेल. कंपन्यांमध्ये काेणत्याही प्रकारची रिंग तयार हाेऊन गैरप्रकार घडू नयेत, यासाठी व्यवस्थापनाने सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.