राज्यात 2.56 लाख काेटींची गुंतवणूक हाेणार : मुख्यमंत्री

    25-Apr-2026
Total Views |
 

CM 
 
राज्यात माेठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून राेजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी 2 लाख 56 हजार 137.01 काेटींच्या 18 िअतिविशाल प्रकल्पांना विशेष प्राेत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राेजगारनिर्मितीहाेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्याेग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली.बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्याेग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्याेग विभागाचे प्रधान सचिव डाॅ. पी. अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू; तसेच विकास आयु्नत दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित हाेते.
 
या बैठकीमध्ये थ्रस्ट सेक्टर तसेच उच्च तंत्रज्ञानावर आधारित साेलर सेल, माॅड्युल, इन्गाॅट, वेफर्स, ग्रीन स्टील, हरित अमाेनिया, इलेक्ट्राॅनिक्स उत्पादने, अवकाश व संरक्षण साहित्य, लिथियम-आयन बॅटरी, इलेक्ट्रिकवाहन निर्मिती/ साहित्य, स्टील व गॅसटू- केमिकल निर्मितीच्या माेठ्या प्रकल्पांना विशेष प्राेत्साहन मंजूर करण्यासाठीच्या 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.यात नाशिकमधील व्हर्च्युओसाे काॅम्प्रेसर्स प्रा. लि., छत्रपती संभाजीनगरमधील नायडेक ग्लाेबल अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि., शिरूर भागात जबिल सर्किट इंडिया प्रा. लि., गडचिराेलीत हरिओम पाइप इंडस्ट्रीज लि., तळेगाव भागात युराेबस इंडिया प्रा. लि. आदी कंपन्यांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.