एक व्य्नती अगदी एकाकी पडली हाेती.त्याचे नातेवाईक, मित्र सगळे त्याला साेडून गेले हाेते. जवळजवळ सर्वांनीच त्याचा विश्वासघात केला हाेता. एकाकीपणासाेबतच कटू आठवणींनी त्याचे आयुष्य भरून गेले हाेते.हे दुःख आणि एकाकीपणापासून मु्नत हाेण्यासाठी ताे माणूस एका विद्वान महात्म्याकडे गेला. आपल्या नीरस जीवनाची आणि एकाकीपणाची व्यथा त्यांने महात्म्याला सांगितली. आपल्या एकाकीपणावर मात करण्याचा मार्ग सांगावा, अशी त्याने विनवणी केली.महात्मा हसले आणि म्हणाले, हे खूप साेपे आहे. तुम्ही फ्नत माझ्यासारखे मित्रांचे एक वर्तुळ बनव. माझे ते मित्र साेबत असतील, तर मला कधीच एकाकी वाटत नाही. माझे हे मित्र कधीच फसवत नाहीत. विशेष म्हणजे ते पाचही मित्र नेहमीच एकमेकांसाेबत असतात आणि मला चांगली साथ देतात.ती निराश झालेली व्य्नती म्हणाली, तुम्ही खूप नशीबवान आहात. इतके प्रेमळ मित्र! प्रत्येकाच्याच नशिबी नसतात; पण तुमच्या मित्रांसारखे स्नेही शाेधणे हे अगदी कष्टप्रद वाटते.
महात्मा मंद हसत म्हणाले, अरे भाऊ! तुला हे ऐकून आश्चर्य वाटेल; पण काेणतीही व्य्नती माझ्या त्या मित्रांशी सहज मैत्री करू शकते. ते सर्वांशी प्रेमळ, भ्नितभावाने काेणाही साेबत राहतात आणि मैत्रीही मनापासून करतात.त्या व्य्नतीने माेठ्या अपेक्षेने विचारले, मग, ते माझे मित्र हाेतील का? महात्मा म्हणाले, अगदी सहज शक्य आहे; पण त्यासाठी तुला थाेडेसे कष्ट करावे लागतील.
जिद्द ठेवावी लागेल. मन समर्पित करण्याची तयारी ठेवावी लागेल आणि मुख्य म्हणजे मैत्रीची प्रतिज्ञा करावी लागेल. एकदा का तुझी मैत्री झाली की मग कायमची हाेईल.ती व्य्नती उत्साहाने म्हणाली, मग मला आत्ताच्या आत्ता त्या पाच मित्रांची नावे सांगा.ते कुठे भेटतील तेही लवकर सांगा. मी सगळे नियम पाळायला तयार आहे.महात्माजी पुन्हा हसले. म्हणाले, ते पाच मित्र म्हणजे प्रामाणिकपणा, साधेपणा, सच्चेपणा, स्पष्टव्नतेपणा आणि वचनबद्धता. या पाच जणांना तू तुझे मित्र बनव. मग बघ, तुझा एकटेपणा दूर हाेईल.