तुम्ही लीडर झाल्यावर स्वत:मध्ये हे 4 बदल अवश्य करा

    21-Apr-2026
Total Views |
 

leader 
 
हे बदल मनाेवैज्ञानिक आणि भावनात्मक असू शकतात. तसेच राेजच्या जीवनाशी संबंधित सवयींमध्येही असू शकतात. स्वत:मध्ये यशस्वीपणे बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला परिस्थितीचे सखाेल ज्ञान असायला हवे.
 
1) तुमचे मित्र मित्र राहू शकणार नाहीत जर तुम्हाला त्या टीमचा लीडर बनविण्यात आले असेल, ज्या टीमचा तुम्ही कधीकाळी भाग हाेतात, तर संबंधांना नवीन पद्धतीने रिसेट करावे लागू शकते.परिणामकारक लीडरशिपची पहिली मागणी ही असते की, तुम्ही टीममधील प्रत्येक सहकाऱ्याबराेबर समान व याेग्य व्यवहार करावा. काेणा एकाकडे जास्त झुकाल तर संपूर्ण टीमवर चुकीचा परिणाम पडेल. सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवा. व्यावसायिक अंतर कायम ठेवा.
 
2) टीमला बराेबर घेऊन जा पूर्वी तुमची जबाबदारी आपले वागणे आणि परफाॅर्मन्स पर्यंतच मर्यादित हाेती. पण आता टीमच्या प्रत्येक सदस्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्हाला हे निश्चित करावे लागेल की, टीममधील प्रत्येक सदस्याचा उद्देश स्पष्ट असेल. त्यांचे शारीरिक आणि मानसिक आराेग्य चांगले राहील. तुम्हाला हे पाहावे लागेल की, त्यांना वेळाेवेळी फिडबॅक आणि पुढे जाण्यासाठी ठाम दिशा दिली जात आहे किंवा नाही. जर एक लीडर म्हणून तुम्ही आपल्या टीमला काम करण्यासाठी याेग्य वातावरण द्याल तर कामाचा स्तर सुधारेल.
 
3) संस्थेच्या साधनांचे व्यवस्थापक एक लीडर म्हणून तुम्ही आपल्या संस्थेच्या साधनांचे व्यवस्थापकही आहात. एक चांगले मॅनेजर म्हणून ही तुमची जबाबदारी आहे की, तुम्ही संस्थेच्या साधनांचा वापर याेग्य प्रकारे करावा. त्यांना वाढविण्यासाठी मेहनत करत राहा. हे व्यवस्थापन तुमचे प्राधान्य असायला हवे. बाकीगाेष्टी त्यानंतर येतात. जर तुम्ही संस्थेच्याहताकडे लक्ष द्याल, तिच्या बाजूने निर्णय घ्याल तर संस्था तुमच्याशी याेग्य वागणूक ठेवेल.
 
4) मॅनेजमेंटच्या सूचनांचे पालन आवश्यक व्य्नितगत रीतीने तुम्हाला ही सूट असते की, तुम्ही मॅनेजमेंटच्या काेणत्याही निर्णयाला नापसंत कराल, असहमत व्हाल. पण एक लीडर म्हणून तुम्हाला मॅनेजमेंटच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करायला हवा आणि त्यांच्या विचारानुसार स्वत:त बदल घडवून आणायला हवा. याचा अर्थ हा नाही की, तुम्ही ‘कसे’ आणि ‘का’ हे विचारू शकत नाही. पण तुम्हाला हे समजावे लागेल, की तुम्हाला मॅनेजमेंटचे लक्ष्य आणि सूचना यांचे पालन करण्यासाठीच पैसे दिले जात आहेत.