महान वैज्ञानिक थाॅमस अल्वा एडिसनबद्दल सांगितले जाते की, जेव्हा ते विजेच्या बल्बच्या शाेधावर काम करीत हाेते. तेव्हा या सर्व प्रयत्नांत ते अनेकदा अपयशी झाले. पण त्यांनी हार मानली नाही आणि विजेच्या बल्ब शाेधण्यात यश मिळेपर्यंत सतत प्रयत्न करीत राहिले. जेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना अपयशात झालेल्या हानीविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘मी विजेचा बल्ब बनवण्यात अपशयी ालाे नाही आणि या साऱ्या अपयशी प्रयत्नांत माझज्ञ माेलाचा वेळ वाया घालवला आहे. पण या अपयशांनीच मला हे शिकवले आहे की तया सर्व प्रकारे विजेचा बल्ब बनवता येऊ शकत नाही.’ खरे म्हणाल तर अपयशांबाबत एडिसनच्या जीवनाच्या या फिलाॅसफीत मानवी जीवनात यश मिळवण्याचे एक अनमाेल रहस्य दडले आहे.
आणि ती हे आहे की, अपयशच यशाचे मार्ग प्रशस्त करते. थाेड्नयात यशस्वी हाेण्याच्या प्रयत्नात मिळालेल्या पहिल्याच अपयशानंतर जर आपण हार मानून बसलाे तर आपण कधीही यशस्वी हाेऊ शकत नाही.ेस्निस जाणा व अभ्यास करा जेव्हा आपण आपल्या एखाद्या कामात अपयशी हाेताे तेव्हा स्वत:ला हे अवश्य विचारावे की, आपण त्या विधीच्या बेस्निसकडे दुर्लक्ष तर केले नाही ना?’ प्रसिद्ध अमेरिकन माजी बास्केटबाॅल प्लेअर मायकल जाॅर्डन म्हणाले हाेते, ‘मी माझ्या जीवनात सुमारे 9000 शाॅर्ट्समध्ये अपयशी झालाे. 300 गेम्स हरलाे आहे. मी सव्वीसवेळा जिंकता जिंकता पराभूत झालाे आहे आणि याच कारणामुळे मी अखेरीस यशस्वी हाेऊ शकलाे.उणिवा मनापासून शाेधा आपले अपयश तेव्हा अधिक कायमचे बनते जेव्हा आपण अपयशाच्या स्थितीत हार मानून बसताे आणि यशस्वी हाेण्यासाठी पुढील प्रयत्न करणे साेडून ेताे. खरे तर अपयश फक्त आपल्याला हे शिकवते की यशस्वी हाेण्याच्या मार्गात आपल्याकडून काही चूक झाली आहे.
हीच चुकी ओळखून जेव्हा आपण ती सुधारण्याचा मार्ग शाेधताे तेव्हा पुन्हा आपला प्रयत्न नककीच यशाचा प्रयत्न असताे.स्वत:च्या प्रतिभेवर ठाम राहा महान हास्यकलाकार चार्ली चॅपलीनला एकदा पत्रकारांनी विचारले की, जर ते हास्यकलाकार बनू शकले नसते तर काय करीत असता? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘मी आपल्या जीवनात नेहमी लाेकांना हसवू इच्छित हाेताे आणि मला एक जगप्रसिद्ध काॅमेडियनच व्हायचे हाेते. त्यामुळे मी इतर काही बनूच शकलाे नसताे.’ चॅपलीनचा स्वत:च्या प्रतिभेवर जाे विश्वास हाेता, त्यातच यशाचे रहस्य दडले हाेते. त्यामुळे जेव्हा आपण स्वत:च्रूा यशावर संशय न घेता पुढे जाताे तेव्हा यश आपलेच असते.
कठाेर परिश्रमाला काेणताही पर्याय नसताे यशस्वी व्यावसायिकांचे जीवन कठाेर परिश्रमाचे व साधनेचेच असते. यशस्वी हाेण्याचा मार्ग अवघड व आव्हानात्मक असताे. यश मिळवण्यासाठी संघर्ष व त्याग करण्याची गरज असते. जर आपल्याला यश हवे असेल तर आपल्याला याेग्य दिशेने सतत परिश्रम करावे लागतील. जीवनात नेहमी हे लक्षात ठैवा की यशाचा काेणताही शाॅर्ट कट नसताे.