राज्य काैशल्य विद्यापीठाच्या राज्यात पन्नास ठिकाणी हाेणार शाखा : मंगलप्रभात लाेढा

    20-Apr-2026
Total Views |
 
 
 

Skill 
सिंगापूरच्या काैशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यात रतन टाटा महाराष्ट्र राज्य काैशल्य विद्यापीठाने आगामी वर्षापर्यंत 50 ठिकाणी शाखा सुरू कराव्यात; तसेच या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 ट्नके नाेकरीची हमी मिळेल अशा स्वरूपाची विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यावी, असे आवाहन काैशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लाेढा यांनी केले. काैशल्य विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्धापन दिन साेहळ्यात लाेढा बाेलत हाेते. विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. अपूर्वा पालकर, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गाेयल, राज्य नाविन्यता साेसायटीचे आयु्नत डाॅ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकांत पाटील, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, आयुषचे नॅशनल रिसर्च प्राेफेसर डाॅ. भूषण पटवर्धन यावेळी उपस्थित हाेते. आयडिशेन काॅम्पिटिशनसहित विविध स्पर्धातील विद्यार्थ्यांना पारिताेषिक वितरण करण्यात आले. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डाॅ. राजेश तलवारे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या याेगदानाची दखल घेत सर्वाेत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने त्यांचा गाैरव करण्यात आला.