नंदुरबारमध्ये पाेलीस क्रीडासंकुलाचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

    20-Apr-2026
Total Views |
 

police 
 
राज्य शासनाच्या गृह विभागांतर्गत जिल्हा वार्षिक याेजनेतून येथील पाेलिस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या एकलव्य क्रीडा संकुलाच्या इमारतीचे नामकरण तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या बॅडमिंटन काेर्टचे लाेकार्पण पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, राजेश पाडवी, शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डाॅ. मिताली सेठी, पाेलिस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पाेलीस अधीक्षक आनंद कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. एकलव्य क्रीडासंकुलाच्या माध्यमातून पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित व्यायाम, क्रीडा सराव आणि स्पर्धात्मक वातावरण मिळणार असून, त्यातून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ हाेईल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्य्नत केला. मान्यवरांनी एकलव्य क्रीडा संकुलातील विविध सुविधांची पाहणी केली. या संकुलामुळे पाेलिस मुख्यालय परिसरात आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असून, त्याचा लाभ भविष्यात क्रीडा स्पर्धा आणि प्रशिक्षण उपक्रमांनाही हाेणार आहे.