माेठीच बेचैनी येते. एवढा माेठा हा आजार, कधी बरा हाेणार असं आतून वाटत राहतं डाॅ्नटर आले, नुसते त्यांचे बूट वाजले, त्यांचा चेहरा दिसला, स्टेथाेस्काेप दिसला की आजार थाेडासा पळून जाताेच.डाॅ्नटरांनी अजून औषध दिलेलं नाही, फक्त चाैकशी केली, थाेडं तपासलं, कुठं थाेडं ठकठकावलं, त्यांना काय पाहायचं हाेतं ते त्यांनी पाहिलं, त्यांनी आपलं स्पेशलायझेशन दाखवलं.त्यांनी म्हटलं, ‘काही विशेष नाही, थाेडंसं आहे. दाेन दिवसात औषधानं आपला आजार आता पळालाच. कधी विचार केलात का अजून डाॅ्नटरांचं प्रिस्क्रिप्शन, इंजे्नशन, औषध वगैरे तर काहीच आलेलं नसतं, तरी आजार पळू लागलेला असताे. मन स्वत:लाच समजावू लागतं.
एवढे माेठे डाॅ्नटर सांगताहेत म्हणजे बराेबर असलंच पाहिजे. आपण आजारी असलात अन् डाॅ्नटरांनी असं म्हटलं तर मन स्वत:शीच विचार करू लागतं मग आपण ठीक आहाेतच. डाॅ्नटरांनी असं म्हटलंय ना बिलकुल ठीक आहे, काही विशेष नाही, तर मग आपण बरे आहाेतच. असा विचार करत असतानाच आपण बरे हाेत असल्याचा अनुभव पण आपणास येताे.तत्काळ एक ताजेपण वाटू लागते. ताप कमी हाेऊ लागताे, हुशारी वाटू लागते. आजार जाऊ लागल्याचं दिसतं. अन् अजून तर डाॅ्नटरांचं औषधपण आलेलं नसतं. खाेटा आजार खाेट्या औषधानं बरा हाेताे.पश्चिमेत डाॅ्नटर लाेक एका नव्या औषधाच्या मागे लागलेले आहेत. तिकडे नव्या प्रकारच्या औषधावर बरंच काम हाेतंय. फसवं औषध. त्या सगळ्यांना माेठं आश्चर्य वाटत आहे. एकाच राेगाचे दहा पेशंट्स असतात. पैकी पाचांना औषध दिलं आणि पाचांना नुसतं पाणी दिलं आहे.औषध दिलेल्या पाचांपैकी तीन राेगी बरे झालेत आणि नुसतं पाणी दिलेल्या पाचांपैकीही तीन राेगी बरे झालेत.