मुंबई महापालिकेच्या स्माईल काैन्सिलचे कार्य अभिनंदनीय

    20-Apr-2026
Total Views |
 
 
 

mumbai 
मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील साेसायटी फाॅर मुंबई इन्क्युबेशन लॅब टू एंटरप्रेन्याेरशिप (स्माईल) काॅन्सिलच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील विविध स्टार्टअप उद्याेगांना बळ देण्याचे करण्यात येत असलेले कार्य अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन महापालिकेचे अतिर्नित आयु्नत अविनाश ढाकणे यांनी केले.‘मुव्ही ट्रॅप’ या डासनिर्मूलनात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या उत्पादनाच्या शुभारंभप्रसंगी ढाकणे बाेलत हाेते. शास्त्रज्ञ प्रा. ए. पी. दाश, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. मनाेहर चासकर, प्रा.सुशांताकुमार घाेष, दिल्लीस्थित आयसीडीएचआय संस्थेचे सल्लागार डाॅ.रजनी कांत, महापालिकेच्या व्यवसाय विकास कक्षाच्या डाॅ. शशी बाला, नायर रुग्णालयातील प्रिव्हेंटिव्ह व साेशल मेडिसिन विभागाच्या विभागप्रमुख डाॅ. रुजुता हाडये, महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी रितेश मरापे, मुव्ही ट्रॅपचे प्रसाद फडके आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित हाेते.मुव्ही ट्रॅप हे उपकरण घरातही सहजपणे वापरता येण्याजाेगे असल्याचे डाॅ. शशी बाला यांनी सांगितले. मुव्ही बायाे ट्रॅप हे पॅसिव्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असणारे उपकरण आहे.इकाे बायाे ट्रॅपमुळे डासांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि चिकनगुनिया, डेंग्यू, झिका आणि मलेरियाच्या प्रादुर्भावावेळी सध्याच्या एकात्मिक डास नियंत्रण व्यवस्थापन कार्यक्रमांत याचा समावेश हाेऊ शकताे, असे फडके यांनी सांगितले.