राज्यात पालघर, अहिल्यानगर, बारामती, येरवडा क्र. 2 व क्र. 3, गाेंदिया, हिंगाेली, भुसावळ (जि. जळगाव) व अंबाजाेगाई (जि.बीड), अशा एकूण नऊ ठिकाणी नवीन मध्यवर्ती व जिल्हा कारागृहे बांधणे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण 12258 ने बंदी क्षमतेत वाढ हाेणार आहे. त्यापैकी पालघर, नारायणडाेह (अहिल्यानगर) व बारामतीत (पुणे) अनुक्रमे 18, 35 व 60 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित बांधकामे प्रगतिपथावर आहेत.येरवडा मध्यवर्ती, येरवडा खुले, येरवडा महिला खुले कारागृह, नागपूर कारागृह, बुलढाणा जिल्हा कारागृह, यवतमाळ व वर्धा जिल्हा कारागृहात मिळून 35 ॅरेकची बांधकामे प्रगतिपथावर असून, ती पूर्ण हाेताच एकूण अधिकृत बंदी क्षमतेत 1035 एवढी वाढ हाेणार आहे.
तसेच, 2025- 26 या आर्थिक वर्षात संभाजीनगर मध्यवर्ती व संभाजीनगर खुले कारागृह, अकाेला महिला खुले कारागृह, काेल्हापूर खुले कारागृह, विसापूर (जि. अहिल्यानगर) खुले कारागृह, लातूर जिल्हा कारागृह, जालना जिल्हा कारागृह व धुळे खुले कारागृह या अस्तित्वातील कारागृहांत अतिरिक्त बॅरेक्सच्या बांधकामास प्रशसकीय मान्यता देण्यात आली आहे. ही बांधकामे पूर्ण हाेताच एकूण 1138 एवढ्या बंदी क्षमतेत वाढ हाेणार आहे.नवीन कारागृह बांधकामांची एकूण बंदी क्षमता 12258 व अतिरिक्त बॅरेक्सची बांधकामे 4029, असे एकूण 16287 नव्याने बंदी क्षमतेत वाढ हाेणार आहे. राज्यातील कारागृहांतील बंद्याची वाढती संख्या लक्षात घेता एकूण 14 ठिकाणी नवीन जागेची मागणी करण्यात आली आहे.नवीन जागा कारागृह विभागास प्राप्त हाेताच, तेथे नवीन मध्यवर्ती/जिल्हा कारागृहे प्रस्तावित करता येतील. त्यामुळे राज्यातील कारागृहांच्या बंदी क्षमतेत वाढ हाेणार आहे.