औष्णिक विद्युत केंद्रांत सांडपाणी वापराचा ऊर्जा राज्यमंत्री मेघना बाेर्डीकर यांच्याकडून आढावा

    20-Apr-2026
Total Views |
 
 

home 
 
एसटीपी प्रकल्प उभारून महानिर्मितीअंतर्गत भुसावळ व पारस औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये नजीकच्या महापालिका, नगरपालिकांकडील सांडपाणी वापरले जाण्याबाबतचा आढावा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकाेरे-बाेर्डीकर यांनी घेतला. एमएसईबी हाेल्डिंग कंपनी कार्यालयात झालेल्या या बैठकीस संचालक अभय हरणे, काेराडी औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता शिरीष वाठ यांच्यासह महापालिका आयु्नत जळगाव, अकाेला; तसेच नगरपरिषद भुसावळ व शेगावचे अधिकारी उपस्थित हाेते.
औष्णिक विद्युत केंद्रांना आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी एसटीपी प्रकल्प उभारून नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील सांडपाणी वापरल्यास सांडपाण्याचे याेग्य व्यवस्थापन हाेऊन जलप्रदूषणात घट हाेण्यास मदत हाेईल.
 
या औष्णिक केंद्राला आवश्यक पाणीपुरवठाही उपलब्ध हाेईल, असे साकाेरे-बाेर्डीकर यांनी सांगितले. शेगावचे 8 एमएलडी पाणी औष्णिक विद्युत केंद्रासाठी घेण्याबाबतही शेगावच्या मुख्याधिकाऱ्यांनी विनंती केली हाेती. त्या अनुषंगाने ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना साकाेरे-बाेर्डीकर यांनी याविषयी तांत्रिक व्यवहार्यता तपासणी करण्याच्या सूचना केल्या. काेराडी केंद्रासाठी 110 एमएलडीचा प्रकल्प नवीन असून, नागपूर शहरातील सांडपाण्यावर ताे चालवण्यात येणार आहे. भुसावळ येथील प्रकल्पासाठी जळगाव व भुसावळ शहरातील 100 एमएलडी सांडपाणी आणि पारस विद्युत केंद्रासाठी अकाेला शहरातील 25 एमएलडी सांडपाणी वापरले जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.