पाेश्चरच्या या दुखण्याला काेण जबाबदार आहे?

    20-Apr-2026
Total Views |
 

Health 
 
सुखद झाेपेचे फायदे तर तुम्ही जाणताच.पण झाेपण्याची मुद्रा व्यवस्थित नसेल तर झाेप दुखण्याचे कारण बनू शकते. याेग्य पद्धतीने न झाेपल्यामुळे मान व कंबरदुखीच्या समस्या हाेतात. ज्यांना पूर्वीपासून ही समस्या असेल त्यांचा त्रास वाढताे. यासाठी आरामदायक बिछान्यात याेग्य मुद्रेत झाेपी जावे.चुकीच्या प्रकारे झाेपल्याने ताेटे पालथे वा उताणे झाेपणे वा नेहमी कुशीवर झाेपणे आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम करते. ज्यात मान, खांदे, मांड्या व कंबरेखालील भागावर जास्त दाब पडू शकताे.तसेच अ‍ॅसिड रिफ्ले्नस, घाेरणे, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या व झाेप व्यवस्थित न हाेणे या समस्या हाेऊ शकतात. काही मुद्रा अशा आहेत ज्यात झाेपल्यास थाेडा वेळ आराम मिळताे पण जास्त काळ अशाप्रकारे झाेपल्यास आराेग्यावर विपरीत परिणाम हाेऊ लागताे.
 
एकाच कुशीवर झाेपणे : एकाच कुशीवर दाेन्ही पाय छातीला चिकटवून झाेपण्याच्या मुद्रेला ‘फेटल पाेझिशन’ म्हणतात.या मुद्रेत झाेपताना बहुतेक लाेक आपल्या हाताचा उशीच्या रूपात वापर करतात. असे झाेपल्यामुळे मान व कंबरेचे स्नायू रात्रभर वळलेले राहतात. ज्यामुळे त्यांच्यावर जास्त दाब पडून ते दुखतात.
 
पालथे झाेपणे : पालथे झाेपल्यास मान रात्रभर वळलेली राहते आणि पाठीवरही जास्त ताण राहताे. दीर्घकाळ असे राहिल्यामुळे मान व पाठ दुखण्याची समस्या हाेऊ शकते.
 
डाे्नयाखाली हात ठेवून झाेपणे : काही काळ आराम करण्यासाठी ही मुद्रा वाईट नाही पण रात्रभर या मुद्रेत झाेपू नये. या मुद्रेत झाेपल्यामुळे हातांचे स्नायू दीर्घकाळ दबलेले राहतात ज्यामुळे हातांमध्ये बधिरपणा येण्याची समस्या हाेऊ शकते.या आहेत चांगल्या
 
मुद्रा : पाठीवर म्हणजेच उताणे झाेपणे सर्वांत चांगले मानले जाते. कारण यात संपूर्ण शरीराचा भार काेणत्याही एका भागावर पडत नाही.पाठदुखीने त्रस्त लाेकांसाठी ही मुद्रा विशेष फायदेशीर असते. कूस बदलत झाेपल्यामुळे कंबरदुखीत आराम मिळताे. पण अशाप्रकारे झाेपताना डाे्नयाखाली एखादी आरामदायक उशी घ्यावी. जेणेकरून मान, कंबर व हातांच्या स्नायूंवर जादा दाब पडणार नाही.
 
याही गाेष्टी लक्षात ठेवाव्यात
 
 आपल्या गरजेनुसार उशा व तक्के निवडा आणि आरामदायक बिछान्यावरच झाेपा.कधीही खूप सारे उशा लावून झाेपू नका. यामुळे मान दुखू शकते.
 बालासन, अधाेमुख शवासन आणि उत्थित त्रिकाेणासन, कंबरदुखी व मानदुखीपासून आराम देतात.
 सपाेर्टिव्ह स्ट्र्नचर अर्थातच एखादी मऊ उशी पाठ व पाेटाखाली ठेवून आराम मिळताे. झाेपताना मान व कणा सरळ असायला हवा. जेणेकरून पाठदुखी हाेणार नाही.
 कंबरदुखीने त्रस्त लाेकांनी अत्यंत मुलायम बिछान्यावर झाेपू नये.
 कुशीवर झाेपताना गुडघ्यांमध्ये एक उशी ठेवून झाेपल्यास कंबरदुखी हाेत नाही.
 नियमितपणे याेगाभ्यास करावा