धारावीतील एसटीपी पुढील वर्षी जुलैपर्यंत सुरू करा

    20-Apr-2026
Total Views |
 
 

dharavi 
 
मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मलजल प्रक्रिया केंद्र महत्त्वपूर्ण असून, जुलै 2027 पर्यंत धारावीतील मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित हाेईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयु्नतअश्विन भिडे यांनी दिले.आयु्नतांनी शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. धारावीतील 418 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र आणि चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचू नये, म्हणून पर्जन्य जलवाहिन्या विभागाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचा आढावा घेतला. मुंबईत सध्या वरळी, वांद्रे, मालाड, घाटकाेपर, धारावी, भांडुप व वर्साेवा, अशा 7 ठिकाणी एसटीपी केंद्रे उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पांतून राेज सुमारे 2464 दशलक्ष लिटर पाण्यावर तृतीयस्तरावरील प्रक्रिया करून 50 ट्नके म्हणजे 1232 दशलक्ष लिटर पाणी पिण्यायाेग्य करण्यात येईल, अशी महापालिकेची याेजना आहे.
 
चुनाभट्टी रेल्वेस्थानक परिसरात 2024 मध्ये जलकाेंडी झाली हाेती.2025 मध्ये पाणी साचू नये यासाठी महापालिकेकडून काही उपाययाेजना करण्यात आल्या. त्यामुळे 19 ऑगस्ट 2025 वगळता संपूर्ण पावसाळ्यात पाणी साचले नाही. या सर्व उपाययाेजनांची पाहणी करून संपूर्ण व्यवस्था अधिक कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. हा प्रकल्प सिक्वेन्सियल बॅचिंग रिक्टर तंत्रज्ञानावर आधारित आहे. अत्यंत कमी जागेत एकापेक्षा अधिक मजल्यांच्या इमारतीत प्रकल्प कार्यान्वित हाेणार आहे.या प्रकल्पांतर्गत प्रवेशित सांडपाणी उदंचन केंद्र, स्लज रूम, सिक्वेन्सियल बॅचिंग रिऍक्टर प्रक्रियेसाठी उभारण्यात येणाऱ्या टाक्या, तृतीयस्तरीय शुद्धीकरण प्रक्रियेची इमारत, गाळ प्रक्रिया टाकी, सांडपाणी घेऊन येणाऱ्या बाेगद्यास जाेडलेला शाफ्ट आणि प्रक्रिया केलेले पाणी घेऊन जाणारा शाफ्ट या सर्व घटकांची पाहणी आयु्नतांनी केली.