3. दान : दान नेहमी सत्पात्री असावे. गरजवंताला, निर्धन व्यक्तीला धन दिले तर त्याला त्याचा उपयाेग तरी हाेईल; पण ‘ज्यांच्या घरी, धनाच्या राशी’ त्याला त्याचे काय महत्त्व? 4. दिवा : रात्री किंवा काळाेखात दिवा उजेड देताे. सगळे स्पष्ट दिसू लागते; परंतु दिवसाउजेडी सूर्यनारायणाची कृपा सर्व विश्वावर असताना दिवा काय उजेड देणार? दिव्याची वात, तेल, दिवा लावणे सर्व व्यर्थच.
बाेध : काेणतीही गाेष्ट काळ, वेळ, व्यक्ती, ठिकाण यासाठी उपयुक्त नसेल तर ती गाेष्ट, ते कार्य निष्फळ किंवा मूर्खपणाचे ठरते.