जर तुम्हाला तुमची पार्टी यशस्वी व्हावी असं वाटत असेल तर काही गाेष्टींकडे लक्ष द्या. ज्यामुळे सगळे जणच पार्टीचा आनंद घेऊ शकतील व तुमची पार्टी यशस्वी हाेऊ शकेल.सगळ्यात आधी हे ठरवा की, तुम्ही तुमच्या पार्टीवर किती पैसे खर्च करू इच्छिता? तुमच्या बजेटच्या बाहेर जाऊन खर्च करू नका. थाेडक्यात अंथरूण पाहून पाय पसरा. ज्यांना तुम्ही पार्टीला बाेलवू इच्छिता त्यांची यादी तयार करा. उगाच गर्दी जमा करू नका. खास लाेकांनाच बाेलवा. जर निमंत्रण पत्रिका देऊ इच्छित असाल तर लवकर छापून घ्या. जर तुम्ही व्यक्तिगत निमंत्रण देऊ इच्छित असाल तर किमान एक आठवडा आधी द्या.या नियाेजनानंतर तुम्ही पार्टी कुठे देणार आहात, हे ठरवा. जर पार्टी हाॅटेलमध्ये देऊ इच्छित असाल तर लवकरात लवकर बुकिंग करा. पाहुण्यांची आवड लक्षात घेऊन त्यानुसारच मेन्यू ठरवा.
जर तुम्ही मांसाहार करत असाल तर मांसाहारी पदार्थ ठेवायला हरकत नाही. पण ही व्यवस्था स्वतंत्र असावी. जर पार्टीचं आयाेजन घरातील हाॅलमध्ये करत असाल तर एक गाेष्ट लक्षात घ्या की, सगळ्या पाहुण्यांना व्यवस्थित जागा पुरेल. घर स्वच्छ, सुसज्ज करा. सुंदर, सजलेल्या खाेलीत पार्टीचा आनंद अधिकच खुलताे.जर तुम्ही लाॅन किंवा माेकळ्या मैदानात पार्टी देऊ इच्छित असाल तर हवामानाचा अंदाज घेऊन व्यवस्था करा. जर ते पावसाळ्याचे दिवस असतील तर पार्टी बाहेर करणे याेग्य नाही.जर तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल तर जास्तीत जास्त मुलांना बाेलविणे उचित ठरेल. मुलांची आवड लक्षात घेऊन मेन्यू ठरवा. त्यांच्या मनाेरंजनासाठी खेळ, नृत्य, संगीत यांचं आयाेजन करा. मुलांना रिटर्न गिफ्टही द्या.माेठ्या पाहुण्यांची आवड लक्षात घेत संगीताचं आयाेजन करा. कर्कश संगीत लावू नका. पाहुण्यांचं स्वागत हसून करा.तसंच स्वतःही प्रसन्नचित्त राहून पार्टीचा आनंद घ्या. प्रत्येक पाहुण्याची दखल घ्या. सगळ्या पाहुण्यांना धन्यवाद देण्यास विसरू नका.