हा आठवडा तुमच्यासाठी नेट्नया कामाने आणि हुशारीने यश मिळवून देणारा राहणार आहे. तुम्ही तुमच्या कामांचे नियाेजन करून ती पूर्ण कराल. ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाची व एकाग्रतेची प्रशंसा हाेईल. आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्च आटाेपशीर ठेवावेत.
नाेकरी-व्यवसाय : करिअरबाबतीत तुमच्यासाठी आठवड्याची सुरुवात सामान्य राहील. पण हळू हळू कामाला वेग येईल. नाेकरदारांनी आपल्या कामात लक्ष व शिस्त बाळगण्याची गरज असेल. व्यापाऱ्यांना नव्या संधी मिळू शकतात आणि जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकताे.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या दांपत्य नात्यामध्ये सामंजस्य व समजुतदारपणा राहील. भावनिक जवळीक निर्माण हाेईल. अविवाहित मंडळींसाठी उत्तम स्थळ चालून येण्याचीही श्नयता आहे. कुटुंबासाेबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील. नात्यांमध्ये पारदर्शकता टिकवून ठेवावी.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील. पण पचनासंबंधित तसेच पाेटाच्या समस्या वाढण्याची श्नयता आहे. खाण्या-पिण्याबाबत सावधगिरी बाळगावी. तसेच नियमित दिनचर्येचा अवलंब करावा. तुमच्यासाठी याेग आणि प्राणायाम करणे फायदेशीर ठरू शकते.
शुभदिनांक : 20, 21, 25
शुभरंग : हिरवा, पांढरा, गुलाबी
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : अत्याधिक चिंता करणे आणि टिका करणे टाळावे. अन्यथा मानसिक तणाव वाढू शकताे.
उपाय : या आठवड्यात बुधवारी श्रीगणेशाला दूर्वा व माेदक अर्पण करावेत व ॐ गं गणपतये नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा.