वसंत ऋतूत बहरलेल्या माेहक ताज्या फुलांनी दत्तमंदिरात वासंतिक पुष्पाेत्सव रंगला

    19-Apr-2026
Total Views |
 
 

vasant 
वसंत ऋतूत बहरलेली जाईजुई, माेगरा, लिली, शेवंती, साेनचाफा, तगर, निशिगंध अशा शाेभिवंत फुलांची आरास सुवासिक फुलांनी साकारलेले विविध हार, माेगऱ्याच्या फुलांचा पाेशाख आणि गुलाब, झेंडू, चाफा यासारख्या 25 लाख फुलांची सजावट लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आली.दत्तमंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वासंतिक पुष्पाेत्सवाचे आयाेजन सत्तू अमावास्येला करण्यात येते. फुलांची ही आरास पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली हाेती. उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई यांच्या हस्ते पारंपरिक लघुरूद्र करण्यात आला. अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम-जहागिरदार आणि उत्सवप्रमुख महेंद्र पिसाळ यांच्या हस्ते श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी विश्वस्त डाॅ. विठ्ठल नेउरगावकर यांच्या हस्ते सायंआरती करून भाविकांना चैत्र महिन्यातील विशेष प्रसाद म्हणून कैरीची डाळ, पन्हे वाटप करण्यात आले.