हा आठवडा तुमच्यासाठी स्थैर्य व प्रगतीचे संकेत घेऊन येईल. तुमच्या धैर्य आणि मेहनतीचे उत्तम परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. पण तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत दिसून येत आहेत. कुटुंबाची मदत मिळेल व घरगुती वातावरण सुखद राहील.
■ नोकरी-व्यवसाय या आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा दबाव राहण्याची शक्यता आहे पण हळूहळू स्थिती तुमच्यासाठी अनुकूल होईल. नोकरदारांना वरिष्ठांची मदत लाभेल. व्यापाऱ्यांना नव्या संधी मिळतील. भागीदारीत काम करणाऱ्यांनी मात्र थोडे सावध राहण्याची गरज आहे.
■ नातीगोती या आठवड्यात तुमचे दांपत्यजीवन सामंजस्याचे राहणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा सहवास चांगल्या प्रकारे लाभेल. अविवाहित मंडळींसाठी विवाहाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. तुम्ही कुटुंब व मित्रांसोबत आनंदाचे उत्तम क्षण भोगू शकाल.
· आरोग्य : या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील पण तुम्ही खाण्या-पिण्याबाबत संयम बाळगावा अन्यथा घसा व पचनासंबंधित त्रास होऊ शकतो. तसेच जॉइंट पेन वा स्किनसंबंधित समस्या असू शकतात. तुम्ही नियमित व्यायाम व योगसाधना करणे फायदेशीर राहील.
■ शुभदिनांक : २०, २१, २५
शुभरंग हिरवा, पांढरा, गुलाबी
■ शुभवार बुधवार, शुक्रवार, शनिवार
■ दक्षता या आठवड्यात आळस झटकावा अन्यथा संधी हातून :निघून जाईल.
■ उपाय : शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा करावी व पांढरे फूल अर्पण करावे. ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः चा १०८ वेळा जप करावा.