डाॅ. नीलम गाेऱ्हे, आदिती तटकरे यांच्याशी विधिमंडळात विद्यार्थ्यांनी साधला संवाद
19-Apr-2026
Total Views |
विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे 60 विद्यार्थ्यांनी विधान भवनाला भेट दिली. या भेटीत उपसभापती डाॅ.नीलम गाेऱ्हे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.डाॅ. गाेऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत विधिमंडळाचे कामकाज उलगडून सांगितले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने प्रश्न विचारत संवाद रंगवला. तटकरे यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारत महत्त्वाचे निर्णय आणि धाेरणांची माहिती दिली.मुलांमध्ये स्वयंशिस्त निर्माण व्हावी आणि त्यांच्या आराेग्यावर परिणाम हाेऊ नये यासाठी इतर देशांच्या धर्तीवर साेशल मीडियाच्या वापरावर निर्बंध घालण्याबाबत विचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमात अनिकेत तटकरे यांनी दाेन्ही सभागृहांची सविस्तर माहिती दिली. जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने यांच्यासह अधिकारी व शाळेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित हाेते.