नागपूर लाेकभवनात अत्याधुनिक ‘साैरऊर्जा’प्रकल्पाचे उद्घाटन

    19-Apr-2026
Total Views |
 
 
 

solar 
पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी येथील लाेकभवनात अत्याधुनिक साैरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. प्रकल्पाची क्षमता 90 किलाेवाॅट असून, त्यातून दरवर्षी सुमारे 1 लाख 15 हजार 200 युनिट्स स्वच्छ वीजनिर्मिती अपेक्षित आहे.राज्यपालांचे सचिव डाॅ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे प्रबंधक डाॅ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे खासगी सचिव पवन सिंह, राज्यपालांचे अतिर्नित प्रबंधक रमेश येवले, विभागीय महाव्यवस्थापक (महाऊर्जा) सारंग महाजन; तसेच अभियंते अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित हाेते.
 
 हरित ऊर्जा हीच भविष्याची गरज असून, अशा प्रकल्पांमुळे ेवळ पर्यावरणाचे संरक्षण हाेत नाही, तर ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर हाेण्यासाठीही माेठी मदत हाेते, असे राज्यपालांनी सांगितले.नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात अशा प्रकल्पांमुळे इतर संस्था आणि नागरिकांनाही नवीकरणीय ऊर्जेकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्य्नत केला.या प्रकल्पामुळे पारंपरिक ऊर्जा स्राेतांवरील अवलंबित्व कमी हाेऊन कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट हाेणार आहे. तसेच वीजबिलात बचत हाेऊन दीर्घकालीन आर्थिक फायदा हाेणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यपालांचे अतिर्नित प्रबंधक रमेश येवले यांच्यासह मेडाच्या अधिकाऱ्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी केली. राज्यपालांनी या सर्वांचे काैतुक केले.