हा आठवडा तुमच्यासाठी आत्मचिंतन व बदलाचा संकेत घेऊन येईल. तुम्ही तुमच्या कामात खाेलवर विचार करून निर्णय घ्याल. ज्यामुळे उत्तम परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात काही आव्हाने उभी राहू शकतात पण तुम्ही दृढ इच्छाशक्तीच्या बळावर ती पार कराल. आर्थिक स्थितीत चढ-उतार राहतील.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्याच्या सुरुवातीला कामांमध्ये अडथळे येण्याची श्नयता आहे, पण हळू हळू स्थिती अनुकूल हाेत जाईल. नाेकरदारांनी धैर्याने व परिश्रमाने काम करायला हवे. व्यापाऱ्यांसाठी नव्या संधी मिळू शकतात. पण जाेखीम घेण्यापूर्वी विचार करावा.
नातीगाेती : या आठवड्याची सुरुवात उत्तम असेल. वैवाहिक जीवनासाठी आठवडा चांगला असून, दांपत्य जीवनात सामंजस्य आणि विश्वास वाढेल. कुटुंबासाेबत वेळ घालवलयामुळे मानसिक शांती लाभेल. अविवाहित मंडळींसाठी नवे नाते जाेडले जाण्याची श्नयता दिसून येत आहे.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहणार आहे. पाेट आणि रक्तासंबंधित समस्यांबाबत सावध राहावे. या दिवसात तामसी आहार घेणे टाळणे तुमच्यासाठी याेग्य राहील. साेबतच याेग आणि ध्यान करणे आवश्यक आहे. स्क्रीन टाइम कमी करून पुरेशी झाेप घ्यावी.
शुभदिनांक : 19, 22, 23
शुभरंग : लाल, पिवळा, क्रीम
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
दक्षता : या आठवड्यात अत्याधिक संशय व गुप्त गाेष्टी शेअर करणे टाळावे.
उपाय : या आठवड्यात मंगळवारी हनुमानाची पूजा करून शेंंदूर वाहावा आणि ॐ हनुमते नम: चा 108 वेळा जप करावा.