धनु

    19-Apr-2026
Total Views |
 
 

horoscope 
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात भाग्य व प्रयत्नाच्या संतुलनाने यश मिळेल. तुमच्या आत्मविश्वास व सकारात्मक विचाराने कामात प्रगती हाेईल.कार्यक्षेत्रात नव्या संधी मिळू शकतात व तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा मिळू शकते.आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्याची सुरुवात अनुकूल राहील. नाेकरदार लाेकांसाठी नवे प्राेजे्नट मिळू शकते. ज्यात यश मिळेल. बढती वा स्थानबदलाचे याेग हाेत आहेत. व्यापाऱ्यांसाठी वेळ लाभदायक राहतील. नव्या विवेकामुळे फायदा हाेऊ शकताे. शिक्षण, प्रवास व सल्लागार क्षेत्रांत विशेष लाभ हाेईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या दांपत्य जीवनात सामंजस्य व प्रेम टिकून राहील. अविवाहित लाेकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबासाेबत वेळ घालवल्यामुळे तुम्हाला आनंद हाेईल. तुम्हाला तुमच्या मित्रांचे सहकार्य लाभेल. आई-वडिलांसाेबत प्रवासाला जाऊ शकता.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहील, पण जास्त धावपळ झाल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकताे. .ज्या जातकांना मांड्या व कंबरेसंबंधित समस्या असतील त्त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. हा त्रास कमी करण्यासाठी खाण्या-पिण्यात संयम बाळगावा तसेच जागरण टाळण्यावर भर द्यावा.
 
 शुभदिनांक : 19, 22, 23
 
 शुभरंग : लाल, पिवळा, क्रीम
 
 शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
 दक्षता : या आठवड्यात अतिरेकी आत्मविश्वासाने काेणताही जाेखमीचा निर्णय घेऊ नये.
 
 उपाय : गुरुवारी श्रीविष्णूची पूजा करावी व पिवळे वस्त्र अर्पण करावे. साेबत ॐ नमाे भगवते वासुदेवाय चा 108 वेळा जप करावा.