ठाणे वर्तुळाकार मेट्राेच्या कामांना लवकरच सुरुवात

    19-Apr-2026
Total Views |
 

metro 
 
केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या ठाणे वर्तुळाकार मेट्राेच्या कामास घाेडबंदर भागात सुरुवात झाली. शहरातील अंतर्गत मार्गावरील वाहतूक काेंडी साेडवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले असून, शहराच्या अंतर्गत मार्गांवर भविष्यात खाेदकामास सुरुवात हाेणार आहे.घाेडबंदर, जुने ठाणे, वागळे इस्टेट भागात नागरिकरण वाढले आहे. परंतु शहरातील अरुंद रस्त्यांमुळे काेंडी हाेते. तसेच वाहनांचा भारही वाढला आहे. ठाणे शहरात सध्या मेट्राे चार (वडाळाघाटकाेपर-कासारवडवली), मेट्राे चार-अ (कासारवडवली ते गायमुख) आणि कापूरबावडी ते बाळकुम भागात मेट्राे पाच (ठाणे-भिवंडी ते कल्याण) या मेट्राेची कामे सुरू आहेत.
 
सध्या एखाद्या प्रवाशाला ठाणे रेल्वे स्थानक गाठायचे असल्यास अंतर्गत मार्गाशिवाय पर्याय नाही.ठाणे शहरातील परिवहन सेवा लाेकसंख्येच्या तुलनेत पुरशी नाही. बहुतांश ठाणेकर ठाणे रेल्वे स्थानक गाठण्यासाठी रिक्षा किंवा खासगी वाहनांचा वापर करतात. अंतर्गत मार्गावर वाहतूक काेंडी हाेते. ही काेंडी कमी करण्यासाठी ठाणे शहरात वर्तुळाकार मेट्राेची घाेषणा करण्यात आली हाेती. त्यानुसार महाराष्ट्र मेट्राे रेल काॅर्पाेरेशन लिमिटेडच्या (महामेट्राे) मदतीने 12 हजार काेटींचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे. हा 29 कि.मीचा काॅरिडाॅर शहराच्या पश्चिम भागाच्या परिघावरून जाणार असून, त्यात एकूण 22 स्थानके असतील.ठाणे वर्तुळाकार मेट्राेच्या कामांना लवकरच सुरुवात