या आठवड्यात तुम्हाला संतुलित पणे व हुशारीने पुढे जावे लागेल. तुम्ही तुमच्या निर्णयांमध्ये संतुलन टिकवून ठेवाल. ज्यामुळे कामांमध्ये यश मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात साेबतच तुमच्या प्रयत्नांची वाहवा हाेईल.आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात सामंजस्य राहील.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्याची सुरुवात काहीशी गडबडीची असणार आहे, पण हळू हळू परिस्थिती अनुकूल हाेत जाईल. नाेकरदारांनी आपल्या कामात स्थैर्य व संतुलन ठेवायला हवे. व्यापाऱ्यांसाठी नव्या संधी मिळतील व भागीदारीत फायदा हाेईल. कला, डिझाइन, क्रिएटिव्ह क्षेत्रातील व्यक्तींना लाभ हाेईल.
नातीगाेती : या आठवड्यात दांपत्य जीवनात प्रेम व समजूतदारपणा वाढेल.अविवाहित जातकांसाठी नव्या नात्यांची सुरुवात हाेऊ शकते. कुटुंबीयांसाेबत वेळ घालवल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसाेबत फिरायला जाण्याची याेजना बनवू शकता.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्या सामान्य राहील. पण कामाच्या व्यापामुळे तुम्हाला मानसिक तणाव आणि थकवा जाणवण्याची श्नयता आहे.तुम्ही नियमितपणे व्यायाम करायला हवा साेबतच संतुलित आहार घ्यावा. पाणी भरपूर प्यावे. त्वचा व किडनीसंबंधित त्रास असणाऱ्यांनी सावध राहावे.
शुभदिनांक : 20, 21, 25
शुभरंग : हिरवा, पांढरा, गुलाबी
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात तुम्ही निर्णय घेण्यास जास्त वेळ लावू नये व इतरांवर अवलंबून राहू नये..
उपाय : शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा करावी, सुगंधी फुले अर्पण करावीत. ॐ श्रीं महालक्ष्म्यै नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा.