सिंह

    19-Apr-2026
Total Views |
 

horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी आत्मविश्वास आणि नेतृत्वक्षमता वाढवणारा राहील.तुम्ही तुमच्या कामांमध्ये पुढे हाेऊन निर्णय घ्याल व यश मिळवाल. कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा मजबूत हाेईल. लाेक तुमच्या व्यवहारांची प्रशंसा करतील. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मिळत आहेत.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्याची सुरुवात सकारात्मक राहील.नाेकरदारांना नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. ज्या तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. बढती वा प्रशंसा मिळण्याची श्नयता आहे. व्यापाऱ्यांसाठी नव्या संधी चालून येतील. जुन्या कामांतून फायदा हाेईल. नेतृत्वासंबंधित कामात यश मिळेल.
 
 नातीगाेती : हा आठवडा दांपत्यजीवनात माधुर्य घेऊन आला आहे.त्यासाेबतच अविवाहित जातकांसाठी नवे संबंध जाेडले जाण्याचा याेग आहे.कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यासाेबतच सामाजिक प्रतिष्ठेतही वाढ हाेईल. मित्रांसाेबतचे तुमचे संबंध मजबूत हाेतील.
 
 आराेग्य : आराेग्याच्या दृष्टिकाेनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. पण हृदय आणि रक्तदाबासंबंधित समसया असणाऱ्या जातकांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यावर लक्ष द्यायला हवे. त्याचा तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम हाेईल.
 
 शुभदिनांक : 19, 22, 23
 
 शुभरंग : लाल, पिवळा, क्रीम
 
 शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
 दक्षता : या आठवड्यात गर्विष्ठपणा टाळावा व इतरांचा सल्ला दुर्लक्षू नये
 
 उपाय : या आठवड्यात रविवारी सूर्याला अर्घ्य द्यावा व ॐ घृणि सूर्याय नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा.