कुंभ

    19-Apr-2026
Total Views |
 

horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी नवे विचार आणि याेजना साकारण्याचा काळ आहे.तुमचा रचनात्मक दृष्टिकाेन व दूरदर्शीपणा तुम्हाला पुढे जाण्यास मदत करील.कार्यक्षेत्रात काही नव्या संधी मिळू शकतात. ज्याचा फायदा घेणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आर्थिक स्थितीत सुधारणा हाेण्याचे संकेत आहेत.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामात व्यस्तता राहील. नाेकरदारांनी आपल्या कामात नावीन्य आणण्याची गरज आहे. नव्या याेजना यशस्वी हाेऊ शकतात. व्यापाऱ्यांसाठी नव्या संपर्कांमधून फायदा मिळेल.तसेच विस्तार करण्याची संधीही मिळेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात दांपत्य जीवनात सामंजस्य टिकून राहील.अविवाहितांसाठी नवे स्थळ चालून येईल. प्रेमींना त्यांच्या जाेडीदाराकडून भावनिक साथ लाभेल. काैटुंबिक वातावरण सुखद राहणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसाेबत पर्यटनासाठी जाण्याची याेजना आखू शकता. मुलांकडून शुभसमाचार कळेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील. पण तणाव आणि अनियमित दिनचर्येपासून दूर राहावे. झाेप पूर्ण घ्यावे आणि मानसिक संतुलन टिकवून ठेवावे. पाय आघि शिरांसंबंधित समस्या असणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. याेग व ध्यानधारणा तणावमुक्त करील.
 
 शुभदिनांक : 20, 21, 25
 
 शुभरंग : हिरवा, पांढरा, गुलाबी
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात अतिविचार व चिंता टाळावी.
 
 उपाय : शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. काळे तीळ दान करावेत ॐ शं शनैश्चराय नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा.