हा आठवडा तुमच्यासाठी आध्यात्मिक उन्नती व भावनिक संतुलनाचा राहील. तुम्ही तुमची कामे संवेदनशीलतेने व हुशारीने पार पाडाल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे उत्तम परिणाम मिहतततल. व नव्या संधी मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत पण खर्चावर ताबा ठेवायला हवा.
■ नोकरी-व्यवसाय या आठवड्याची सुरुवात अनुकूल राहील. नोकरदारांसाठी नव्या संधी चालून येऊ शकतात. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. बढतीचे योगही जुळून येत आहेत. व्यापाऱ्यांसाठी नव्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. कला, संगीत व आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल.
■ नातीगोती : या आठवड्यात तुमच्या दांपत्यसंबंधात प्रेम आणि सामंजस्य वाढेल. अविवाहित जातकांसाठी नव्या नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. तुम्ही सहकुटुंब एखाद्या कौटुंबिक समारंभात सामील होऊ शकता ज्यामुळे नात्यांत गोडवा निर्माण होईल. मित्रांची मदत मिळेल.
■ आरोग्य या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील. पण जादा धावपळ दगदगीमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. झोप व्यवस्थित न झाल्यामुळे डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता आहे. सकाळी फिरायला जाणे व जलपानात फळे खाणे लाभदायक ठरू शकते.
■ शुभदिनांक : १९, २२, २३
शुभरंग : लाल, पिवळा, क्रीम
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार
दक्षता : या आठवड्यात भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. आर्थिक बाबतीत सावध राहावे.
उपाय : या आठवड्यात गुरुवारी श्रीविष्णूची पूजा करावी पिवळे फूल वाहावे आणि ॐ बृं बृहस्पतये नमः मंत्राचा १०८ वेळा जप करावा.