मिथुन

    19-Apr-2026
Total Views |
 

horoscope 
 
 
हा आठवडा तुमच्यासाठी नवे विचार, संपर्क व संधींनी भरलेला राहील. तुमची हुशारी व संवादकाैशल्य तुम्हाला पुढे जाण्यास मदत करील. कार्यक्षेत्रात काही बदल संभवतात. जे भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा हाेईल पण खर्चावर ताबा ठेवणे आवश्यक आहे.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. नाेकरदारांनी आपल्या कामात नावीन्य आणण्याची गरज असेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ नवे संपर्क बनवण्याचा आणि विस्तार करण्याचा आहे. मीडिया, लेखन, शिक्षण आणि कम्युनिकेशन संबंधितांना फायदा हाेईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात अविवाहितांसाठी नवे नाते जाेडण्यासाठी व नव्या प्रेमासाठी काळ उत्तम आहे. दांपत्य जीवनात सामंजस्य आणि संवादाने नाते मजबूत हाेईल. कुटुुंबासाेबत वेळ घालवण्याची संधी मिळेल व त्यामुळे मन प्रसन्न राहील. मित्रांची मदत मिळेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील पण कामाच्या वाढत्या व्यापामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवू शकताे. तसेच पुरेशा प्रमाणात झाेप घ्यायला हवी तसेच नियमित दिनचर्या अवलंबावी. हिंडण्या-फिरण्यामुळे तुमची मानसिक प्रसन्नता टिकून राहील. त्यासाेबतच मेडिटेशन करावे.
 
 शुभदिनांक : 20, 21, 25
 
 शुभरंग : हिरवा, पांढरा, गुलाबी
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : विचार न करता निर्णय घेऊ नयेत व इतरांच्या सांगण्याने गाेंधळून जाऊ नये.
 
 उपाय : या आठवड्यात बुधवारी श्रीगणेशाला दूर्वा अर्पण करावी व ॐ गं गणपतये नम: मंत्राचा 108 जप करावा.