स्थूलतेमुळे वाढलेले पाेट कमी करण्यासाठी...

    19-Apr-2026
Total Views |
 

fat 
 
स्थूलता वाढण्याचे पहिले लक्षण पाेटाचा आकार वाढणे असते. पुष्ट व सुडाैल शरीर तेव्हाच मानले जाते जेव्हा पाेटाचा आकार जराही वाढलेला नसताे, पण आपल्या देशात एखाद्याचे शरीर जराही स्थूल हाेऊ लागते तेव्हा प्रथम पाेटच बाहेर येते.येथे वाढलेले पाेट कमी करण्यासाठी व पुन्हा वाढू नये यासाठी घरगुती उपाय देत आहाेत. पाेटाचा आकार सामान्य हाेईपर्यंत नियमितपणे हे उपाय करावेतव नंतही पाेट पुन्हा वाढू नये यासाठी दक्षता पाळावी.
 
 राेज सकाळी वा सायंकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पाेट शेकावे.भरपूर गरम पाण्यात जाड टाॅवेल भिजवून पिळावा व पाेटावर पसरून ठेवावा.टाॅवेल अशाप्रकारे ठेवावा की, ताे छातीच्या खाली व नाभीच्या वरचाच भाग झाकू शकेल. जेव्हा टाॅवेल थंडहाेईल तेव्हा ताे पुन्हा पाण्यात बुडवून पिळून घ्यावा व पाेटावर ठेवावा. हा शेक राेज अर्धा तास करणे पुरेसे आहे.
 
 सकाळ-संध्याकाळ शाैचास अवश्य जावे. यामुळे रात्री झाेपताना पाेट हलके राहील व गॅस वाढण्याची वा पाेट फुगण्याची स्थिती हाेणार नाही.अनेकजण फक्त सकाळीच शाैचास जातात. विचारल्यास संध्याकाळी शाैचास हाेत नाहीत असे सांगतात. नयमितपणे ठरावीक वेळी शाैचास जावे.थाेडा वेळ बसावे. जाेर लावला नाही तरी शाैचास हाेऊ लागते.