नक्षत्रवाडीच्या जलशुद्धीकरण केंद्रात जायकवाडी धरणाचे पाणी

    19-Apr-2026
Total Views |
 

dam 
 
शहरातील 18 लाखांहून अधिक नागरिकांचे लक्ष नवीन पाणीपुरवठा याेजनेकडे लागले हाेते. 30 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत जायकवाडीचे पाणी नक्षत्रवाडीच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत यशस्वीपणे आणण्यात आले. पाणी येताच जीवन प्राधिकरण, महापालिका, जीव्हीपीआर कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जल्लाेष केला.पाच वर्षांच्या अथक मेहनतीनंतर हे पाणी आले. जायकवाडीचे पांढरे शुभ्र पाणी पाहून अनेकांच्या डाेळ्यांत आनंदाश्रू तरळले.शहरवासीयांच्या नळापर्यंत अतिर्नित पाणी येण्यासाठी आणखी एक महिना लागेल.गेल्या 23 मार्चपासून 2500 मिमी.व्यासाच्या नवीन जलवाहिनीची चाचणी सुरू हाेती. मंगळवारी नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पडेल, या दृष्टीने नियाेजन करण्यात आले हाेते.
 
जलशुद्धीकरण केंद्रात धाे-धाे पाणी पडू लागताच चारही बाजूंनी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गणपती बाप्पा माेरया, हर हर महादेव, गाेदामायचा जयजयकार केला. महापालिका आयु्नत अमाेल येडगे यांनी जलपूजन केले. यावेळी जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, जीव्हीपीआरचे महेंद्र गाेगलथू आदी यावेळी उपस्थित हाेते.नक्षत्रवाडीच्या मुख्य रस्त्यापासून जलशुद्धीकरण केंद्र 86 फूट उंचीवर आहे.त्यामुळे पाणी वरपर्यंत नेण्यासाठी याेग्य नियाेजन केले हाेते. पाण्याच्या दबावामुळे काेठेही व्हाॅल्व्हला, जलवाहिनीला लिकेज आढळून आले नाही. त्यामुळे शहरात पाणी आणण्याचा प्रयाेग यशस्वी झाला.जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी शुद्ध करण्यात आली आहे. आता पुढचे पंधरा दिवस विविध छाेटी कामे व चाचण्या केल्या जाणार आहेत, असे प्रशासनाने सांगितले.महापालिकेच्या जुन्या एमबीआरला 50 ते 60 एमएलडी वाढीव पाणी दिले जाईल.त्यामुळे नागरिकांना किमान दाेन ते तीन दिवसांआड पाणी मिळेल.