आदिवासी क्षेत्रासाठी रुग्णवाहिकां सुविधेचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लाेकार्पण

    19-Apr-2026
Total Views |
 
 

CM 
 
(स्व.) लीलाराम जांगिड चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यामार्फत ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात रुग्णसेवेसाठी सहा रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या सहा रुग्णवाहिकांचे लाेकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार स्नेहा दुबे, आमदार परिणय फुके यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित हाेते. आदिवासी क्षेत्रात रुग्णसेवेत देण्यात येत असलेल्या रुग्णवाहिकांबाबत मुख्यमंत्र्यांनी जांगिड चॅरिटेबल ट्रस्ट व दरेकर यांच्या कार्याचा गाैरव केला. या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आदिवासी भागातील दुर्गम, डाेंगराळ गावांमध्ये सहजरित्या रुग्णवाहिकेची सेवा मिळणार असल्याने आदिवासी बांधवांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळण्याची अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्य्नत केली.