दिवाणखान्यात प्रदर्शित केल्या जातात काेट्यवधी रुपयांच्या गाड्या

    19-Apr-2026
Total Views |
 


cars
 
अमेरिकेतील बेव्हरली हिल्स येथील प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन बेन तालेई हे याचे एक उदाहरण आहे. त्यांनी आपल्या घराचे नूतनीकरण अशा प्रकारे केले आहे की, काचेच्या भिंतींआडून त्यांच्या दुर्मीळ सुपरकार्सचा संग्रह स्पष्टपणे दिसू शकेल. त्यांच्या स्वयंपाकघरातून सुपरकार्सची एक रांग दिसते.तालेई आपल्या मालमत्तेवर 5,000 चाैरस फुटांची कार गॅलरी बांधण्याची याेजना आखत आहेत, ज्यासाठी अंदाजे 1.3 अब्ज रुपये खर्च येईल.गाड्यांसाठी गॅरेजऐवजी डिझायनर गॅलरी ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, हा नवीन लक्झरी ट्रेंड श्रीमंतांमध्ये वेगाने वाढत आहे. ते आता गाड्यांसाठी गॅरेजऐवजी डिझायनर गॅलरी किंवा खासगी क्लबसारख्या जागा तयार करत आहेत.
 
इंग्लंडच्या काॅट्सवाॅल्ड्समध्ये हाॅलंड ग्रीन या आर्किटेक्चर फर्मने एका क्लायंटसाठी एक गॅरेज डिझाइन केले आहे, जिथे मालक आपल्या फेरारीच्या शेजारी बसून काॅफी पिऊ शकताे, अगदी एखाद्या आर्ट गॅलरीतील चित्रकलेच्या काैतुकाप्रमाणे.हा ट्रेंड केवळ गाड्यांपुरता मर्यादित नाही.महागड्या वाईन आणि लक्झरी हँडबॅग्जसुद्धा तळघरात किंवा बंद शेल्फमध्ये ठेवण्याऐवजी, खास प्रदर्शन जागांमध्ये प्रदर्शित केल्या जात आहेत. पश्चिम लंडनमध्ये, वास्तुविशारद राॅबर्ट डाैगे यांनी एका घरातील पारंपरिक वाईन सेलरच्या जागी एक डिस्प्ले गॅलरी उभारली आहे.त्यामुळे वाईनची गुणवत्ताही जपली जाते. आणि संपूर्ण खाेलीला एका कलादालनाचे स्वरूप देते.
 
काेराेनानंतर आला हा ट्रेंड तज्ज्ञांच्या मते, काेराेना महामारीमुळे लाेकांचा घरातला वेळ वाढू लागला आहे. त्यामुळे त्यांना आपले छंद आणि ओळख घरामध्येच प्रदर्शित करायची आहे. कारण, या माैल्यवान वस्तू पाहण्याचा आनंद त्यांच्यासाठी त्यांच्या मूल्याइतकाच महत्त्वाचा आहे.ड्रेसिंग एरिया बनत आहे वैय्नितक संग्रहालये ड्रेसिंग एरिया आता वैयक्तिक संग्रहालये बनत आहेत. बीसीजी आणि वेस्टियायर कलेक्टिव्हच्या अहवालानुसार, लक्झरी सेकंडहँड मार्केट दरवर्षी 10% पेक्षा जास्त दराने वाढत आहे. त्याचे मूल्य आता 16,60,000 कराेड रुपये (16.6 लाख कराेड रुपये) पेक्षा जास्त आहे. यामुळेच हर्मेस आणि शनेल हँडबॅग्ज आता केवळ अ‍ॅक्सेसरीज न राहता, एक गुंतवणूक मानल्या जातात.