हा आठवडा तुमच्यासाठी परिश्रम व धेर्याने यश मिळवण्याचा काळ राहील. तुम्ही तुमची कामे गांभीर्याने व शिस्तबद्धतेने पूर्ण कराल. ज्याचे चांगले परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात पण तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा दबाव अधिक राहू शकताे पण तुमचे परिश्रम यश देतील. नाेकरदारांना आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. बढतीची संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांना हळूहळू फायदा हाेईल व जुन्या गुंतवणुकीतून लाभ हाेईल.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या दांपत्य जीवनात समजूतदारपणा व सहयाेग टिकून राहील. अविवाहित जातकांसाठी चांगली स्थळे चालून येऊ शकतात. कुटुंबासाेबत वेळ घालवल्यामुळे मानसिक शांती लाभेल.मित्रांसाेबत पिकनिकचा प्लॅन करू शकता.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील पण सांधेदुखी व हाडांशी संबंधित समस्या हाेण्याची श्नयता आहे. विशेषत: गुडघेदुखीचा त्रास हाेण्याची श्नयता आहे. ताे टाळण्यासाठी याेग व व्यायामाची मदत घ्यावी. जेणेकरून तुम्ही तुमचे आराेग्य उत्तम राखू शकाल.
शुभदिनांक : 20, 21, 25
शुभरंग : हिरवा, पांढरा, गुलाबी
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात अत्याधिक कामामुळे तब्बेतीकडे दुर्लक्ष करू नये.
उपाय : या आठवड्यात शनिवारी शनिदेवाची पूजा करून तेल वाहावे व ॐ शं शनैश्चराय नम:हा मंत्र 108 वेळा जपावा.