कर्क

    19-Apr-2026
Total Views |

horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी भावनिक संतुलन व कौटुंबिक सुख घेऊन येईल. तुम्ही तुमच्या कामांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल व तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होईल. कार्यक्षेत्रात काही नवी आव्हाने येण्याची शक्यता आहे पण तुम्ही धैर्याने ती पार पाडाल. आर्थिक स्थिती संतुलित राहील पण खर्चावर ताबा ठेवावा.
 
■ नोकरी-व्यवसाय या आठवड्याची सुरुवात सामान्य राहील. पण मध्यात कामाला वेग येईल. नोकरदार जातकांनी आपली कामे सावधपणे व एकाग्रतेने करायला हवीत. व्यापाऱ्यांना त्यांच्या जुन्या संपर्कांमधून फायदा मिळू शकतो. जमीन वा संपत्तीबाबतच्या कामात यश मिळण्याचे योग आहेत.
 
■ नातीगोती या आठवड्यात तुमच्या दांपत्य जीवनात माधुर्य राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. अविवाहित मंडळींसाठी नवे स्थळ चालून येण्याची शक्यता आहे. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. मुलांनी परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे तुम्ही संतुष्ट राहाल.
 
■ आरोग्य या आठवड्यात आरोग्य सामान्य राहील, पण मानसिक तणाव घेणे व चिंता करणे टाळायला हवे. पचनासंबंधित समस्या होण्याचीही शक्यताआहे. खाण्या-पिण्याबाबत संयम बाळगावा तसेच नियमित योग व ध्यानधारणा करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते...
 
■ शुभदिनांक : १९, २२, २३॥ शुभरंग : लाल, पिवळा,
 
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार
  
■ दक्षता या आठवड्यात भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. आर्थिक व्यवहारात सावध राहावे.
 
■ उपाय: सोमवारी शिवपिंडीवर जल अर्पण करावी व ॐ नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करावा.