आराेग्याची काळजी घेणारा फिटनेस बँड

    19-Apr-2026
Total Views |
 
 

band 
गेल्या काही वर्षांमध्ये महिला आपल्या फिटनेसबाबत जास्त जागरूक झाल्या आहेत. फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी त्या फ्नत आवश्यक डाएट, ए्नसरसाइज आणि नियमच आपल्या रूटीनमध्ये सामील करीत नाहीत, तर आपल्या फिटनेसचा ट्रॅकही ठेवतात.
डिव्हाइस आणि अ‍ॅप्सचा वापर करीत आहेत. यात फिटनेस ट्रॅकर वा बँड सर्वांत जास्त पसंत केले जात आहेत. घड्याळाच्या रूपात वापरले जाणारे हे डिव्हाइस फ्नत महिलांमध्येच नव्हे, तर पुरुषांमध्येही खूपच लाेकप्रिय आहे. ज्याचे कारण असे की, हे त्यांचा स्टायलिश लुक उजळण्यासाेबत त्यांच्या फिटनेसची संपूर्ण काळजीही घेते.एक फिटनेस ए्नसपर्ट सांगते की, वेळ सांगण्यासाेबतच हे फिटनेस बँड्स बाॅडीस्ट्र्नचर आणि वजन लक्षात घेत किती स्पीडमध्ये चालायला हवे, हेही सांगते.या संपूर्ण प्राेसेसला ट्रॅक करण्यासाठी बँड आपल्या सेंसरचा वापर करते. या सेंसरच्या मदतीने हे चाललेली पावले, कॅलरी आणि झाेपेचा आलेखही ठेवत असते.