हा आठवडा तुमच्यासाठी ऊर्जा, उत्साह आणि नव्या संधींनी भरलेला राहील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळतील आणि यश तुमच्या आत्मविश्वासावर अवलंबून राहील. एखाद्या वरिष्ठ वा सहकर्मचाऱ्यासोबत मतभेद संभवतात यामुळे संयमाने वागावे. आर्थिक स्थिती सामान्य राहील, खर्चावर नियंत्रण ठेवावे.
■ नोकरी-व्यवसाय : या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच कामांमध्ये वेग राहील. नव्या योजना तयार होतील व जबाबदाऱ्या वाढतील. नोकरदारांना मानसन्मान वा बढती मिळू शकते. व्यापाऱ्यांना नवे ग्राहक व लाभाच्या संधी आहेत. स्वतंत्रपणे काम करणाऱ्यांना बाहेरून लाभ मिळू शकतो.
■ नातीगोती : या आठवड्यात अविवाहित व्यक्तींना एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी मिळू शकते. वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजुतदारपणा वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलांना मिळालेल्या यशामुळे तुम्हाला संतोष आणि समाधान लाभेल. सहलीची योजना बनवू शकता..
आरोग्य : या आठवड्यात तुमचे आरोग्य सुधारताना दिसून येत आहे. तुमची ऊर्जा उत्तम राहील पण मानसिक तणाव आणि अनियमित दिनचर्या तुम्हाला थकवू शकते. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पूर्ण झोप घ्यायला हवी तसेच खाणेपिणे संतुलित राखायला हवे. डोकेदुखी व रक्तदाब असणाऱ्यांनी जपावे.
■ शुभदिनांक : १९, २२, २३॥
शुभरंग : लाल, पिवळा, क्रीम
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार
■ दक्षता : या आठवड्यात घाईत कोणताही निर्णय घेऊ नका व डोळे झाकून विश्वास ठेवू नये.
उपाय : मंगळवारी हनुमंताला शेंदूर व चमेलीचे तेल अर्पण करा. ॐ हनुम नमः चा १०८ वेळा जप करा व गरजूंना जेवण द्यावे.