बीटामध्ये भरपूर प्रमाणात खनिज लवण आढळतात, म्हणजे लाेह, पाेटॅशियम, सल्फर, क्लाेरीन, साेडियम, आयाेडीन, काॅपर, जीवनसत्त्व अ, ब, क इत्यादी पुरेशा प्रमाणात आढळते.बीट या घटकामुळेच किडनी आणि पित्ताशयाची स्वच्छता करण्यास सक्षम आहे. किडनी आणि पित्ताशयातील खडे निघून जावेत यासाठी बीट सहाय्यक ठरते. त्यासाठी बीट, गाजर, काकडी यांचा रस समप्रमाणात पिण्याने काही दिवसातच खडा मूत्रमार्गाद्वारे शरीरातून बाहेर पडताे.बीटाचं कशाही प्रकारे सेवन करा, म्हणजे सलाद म्हणून खा, काेशिंबीर करून खा, सूप किंवा पराठे बनवून खा, ते ायदेशीरच ठरते. अगदी लाेणचंही बनवून खाऊ शकता. प्रत्येक स्थितीत पचणारं बीट मधुमेहींसाठी मात्र धाेकादायक ठरतं.