झाेपण्यापूर्वी मानसिक तणाव आणि उत्तेजनांपासून मु्नत हाेणं आवश्यक आहे.
जेवणानंतर लगेच झाेपणं हानिकारक ठरतं. रात्रीच्या वेळेस तीव्र मसाले आणि तिखट आहारापासून दूर राहा.
ज्या खाेलीत तुम्ही झाेपणार आहात तेथील हवा स्वच्छ आणि हवेशीर असावी. शुद्ध हवेसाठी खिडक्या उघड्या ठेवाव्यात. बेडशीट आणि उशांचे अभ्रे, पांघरूणं स्वच्छ असावीत.
झाेपण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावेत. शक्य असल्यास अंघाेळ करावी.
झाेपताना जास्त घट्ट कपडे घालू नयेत. सैल कपडे घालण्याने शरीराला पूर्णतः आराम मिळताे.